Boxing Day Test | ‘या’ खेळाडूच्या जागी रवींद्र जडेजाला संधी?
India vs Australia 2nd Test : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचं आव्हान थोपवणं कठीण असणार आहे.
IND vs AUS : बॉक्सिंग डे (Boxing Day Test) कसोटीपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापन अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दुखापतीवर बारीक नजर ठेवून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर भारताचा आघाडीचा अष्टपैलू रवींद्र जडेजा फिट असले तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 26 डिसेंबरपासून सुरू होणार्या दुसर्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात स्नायूंची दुखापत झाली. त्याच लढतीत मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू डोक्यावर आदळल्याने डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांसह पहिल्या कसोटीलाही जडेजाला मुकावे लागले.
अष्टपैलू रवींद्र जडेजा या दोन्ही दुखापतींतून पूर्णपणे सावरला असून त्याने सरावालाही सुरुवात केली आहे. पण, 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे सुरू होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी तो 100 टक्के फिट असेल,, हे ठामपणे सांगता येणार नाही. पण जडेजा तंदुरुस्त असल्यास आंध्र प्रदेशचा फलंदाज हनुमा विहारीला प्ले इलेव्हनमधून बाहेर पडावे लागेल. पहिल्या कसोटी सामन्यात खराब कामगिरीमुळे विहारीला संघाबाहेर ठेवणं हे कारण नसून, अजिंक्य रहाणे आणि रवी शास्त्री यांना सर्वोत्कृष्ट टीम मैदानात उतरवायची आहे.
वाचा : Aus vs Ind 1st Test | पृथ्वी शॉ पुन्हा फ्लॉप; मीम्सचा पाऊस पाडत नेटकऱ्यांनी झोडपलं
बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, “जर जाडेजा बराच काळ गोलंदाजीसाठी (मोठा स्पेल) फीट असेल तर वादाचा प्रश्नच उद्भवत नाही. जडेजा त्याच्या अष्टपैलू कौशल्यांच्या आधारे विहारीची जागा घेईल. तसेच पाच गोलंदाजांसह संघाला मैदानात उतरण्याचा पर्याय मिळेल”.
रवींद्र जडेजा
कसोटी सामने : 49
धावा : 1869 ( 14 अर्धशतक)
हनुमा विहारी
कसोटी सामने : 10
धावा : 576 ( 1 शतक, 4 अर्धशतक)
मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला प्रारंभ होणार असून या लढतीसाठी भारतीय संघात अनेक बदल अपेक्षित आहेत. अॅडलेड येथील प्रकाशझोतातील पहिल्या कसोटीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने कसोटी क्रिकेटमधील भारताची नीचांकी धावसंख्या नोंदवली. त्यातच कोहली आता पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतणार असल्याने जडेजाच्या उपलब्धतेमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता काहीशी कमी झाली आहे. तरी देखील अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचं आव्हान थोपवणं कठीण असणार आहे.
मोहम्मद शमीच्या जागी खेळणार 'हा' खेळाडू, करणार कसोटी पदार्पण
ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं बाहेर गेला आहे. आगामी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते मोहम्मद सिराज मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करु शकतो. सिराजनं सराव सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती.
वाचा : IND vs AUS : भारताचा संपूर्ण डाव एका ट्विटमध्ये! 'त्या' ट्विट वर प्रतिक्रियांचा पाऊस