IND U19 vs AUS U19 Live Updates :भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
IND U19 vs AUS U19 Live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर 19 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना सुरु झाला आहे.
LIVE
Background
IND vs AUS WC 2022 Semifinal: भारताचा अंडर 19 संघ (U19 Team India) सध्या अंडर 19 विश्वचषकात (Under 19 World Cup) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियातील अंटीगा येथील कूलीज क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्याला काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. भारताने नुकतीच नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघात कोरोनाचं संकट आल्यानंतरही भारताने आपली कामगिरी सुरुच ठेवली. भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गतविजेत्या बांग्लादेशचा पाच विकेट्सनी पराभव केला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने देखील बलाढ्य पाकिस्तानला नमवून सेमीफायनलमध्ये स्थान मिळवल्याने आजचा सामना अटीतटीचा होण्याची दाट शक्यता आहे. या विश्वचषकातील भारताचा प्रवास अतिशय खडतर असला तरी भारताने कामगिरी अप्रतिम केली आहे. कारण भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारताने हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान धुळच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती.
[tw]https://twitter.com/ICC/status/1488837122496815105[/tw]
आजच्या सामन्यासाठी भारताचे अंतिम 11 -
अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, शेख रशीद, यश धुल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना (यष्टीरक्षक), राजवर्धन हंगर्गेकर, विकी ओस्तवाल, रवी कुमार
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे अंतिम 11 -
कॅम्पबेल केलवे, टीग वायली, कोरे मिलर, कूपर कॉनोली (कर्णधार), लचलान शॉ, निवेथन राधाकृष्णन, विल्यम साल्झमन, टोबियास स्नेल(यष्टीरक्षक), जॅक सिनफिल्ड, टॉम व्हिटनी, जॅक निस्बेट
ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका, विजयासाठी आणखी 220 धावांची गरज
भारताच्या अंगक्रिश याने कोरी मिलरला तंबूत धाडलं आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 33.3 ओव्हरमध्ये 220 धावांची गरज आहे.
भारताची चांगली सुरुवात ऑस्ट्रेलियाचा एक गडी बाद
भारताने गोलंदाजीची सुरुवात उत्तम केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीग वायली याला रवी कुमारने बाद केलं आहे.
भारताचा डावा आटोपला ऑस्ट्रेलियासमोर 291 धावांच आव्हान
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार यश आणि शेख रशीद यांनी भारताचा डाव सावरत अप्रतिम भागिदारी केली. ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर 291 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
यश पाठोपाठ शेख रशीदही बाद
शेख रशीद 94 धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे त्याचं शतक थोडक्यात हुकलं आहे.
अजबरित्या यश धुल धावचीत
शतक झळकावल्यानंतर काही वेळातच भारतीय कर्णधार यश धुल धावचीत झाला आहे. गोलंदाजाच्या हाताला चेंडू लागू चेंडू नॉनस्ट्राईकवरील स्टम्प्सना लागला ज्यामुळे यश धावचीत झाला.