U19 Asia Cup 2021 Final 2021: भारत आणि श्रीलंका (Sri Lanka U19 vs India U19) यांच्यात दुबई आतंरराष्ट्रीय मैदानात अंडर-19 आशिष चषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. पावसामुळं सामना 38 षटकाचा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं घेतलेला निर्णय फसल्याचं दिसत आहे. भारताच्या आक्रमक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. श्रीलंकेला 38 षटकात 9 विकेट्स गमावून केवळ 106 धावापर्यंत मजल मारता आली. अंडर-19 अशिया विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारताला 107 धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यात श्रीलंकेच्या यासिरु रॉड्रिगोनं सर्वाधिक 19 धावा केल्या आहेत. दरम्यान, पावसामुळं हा सामना 38 षटकांचा करण्यात आलाय. भारताकडून विकी वोत्सवालनं तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय, कौशल कांबळेला दोन विकेट्स प्राप्त झाल्या. तर, राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार आणि राज बवा यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 


संघ-


भारतीय संघ- हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, यश धुल्ल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, आराध्या यादव (विकेटकिपर), कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, रवी कुमार


श्रीलंकेचा संघ- चामिंडू विक्रमसिंघे, शेवोन डॅनियल, ड्युनिथ वेललागे (कर्णधार), रानुदा सोमरथने, रवीन डी सिल्वा, ट्रेवीन मॅथ्यू, अंजला बंडारा (विकेटकिपर), यासिरु रॉड्रिगो, पवन पाथिराजा, सदिशा राजपक्षे, मथीशा पाथिराना


टीम इंडियानं आठव्यांदा अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवलंय. तसेच अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं एकदाही पराभव स्वीकारला नाही. भारतानं आतापर्यंत सातवेळा अंडर-19 आशिया चषक जिंकले आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha