India Tour of South Africa 2021: भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 26 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताला या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उड्डाण करायची आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. याचदरम्यान, दुखापतीमुळं रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी मालिकेतून बाहेर झालाय. तर, एकदिवसीय मालिकेतून विराट कोहलीनं (Virat Kohli) माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. यामुळं कर्णधारपदावरून भारतीय संघात वाद सुरु नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.


भारताचा कसोटी कर्णधार विराटनं नुकताच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकापूर्वी टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटकडून मर्यादित षटकांचं कर्णधारपद काढून घेण्यात आलंय. तर, रोहित शर्माकडं टी-20 आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं. रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. यातच विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेणार आहे. विराटची मुलगी वामिका 11 जानेवारीला पहिला वाढदिवस आहे. त्यामुळं विराटला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छित असल्याचं वृत्त आहे. 


विराट कोहलीनं बीसीसीआयकडं विश्रांतीची मागणी केल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. त्याला नुकतीच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान, विराटच्या निर्णयामुळे बीसीसीआयच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. तसेच कर्णधारपदावरून विराट आणि रोहितमध्ये वाद तर सुरू नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-