India Tour Of South Africa: भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND Vs SA) तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गुरुवारी जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) दाखल झालाय.  या दोऱ्यात भारतीय संघ ती कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. भारताचे खेळाडू हे विशेष विमानानं आफ्रिकेला रवाना झाले. तिथे पोहचल्यानंतर काही खेळाडूंचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.


दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नव्या व्हेरिएंटनं संपूर्ण जगभरात भितीजनक वातावरण निर्माण झालंय. याचदरम्यान, भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, बीसीसीआयनं भारताच्या दक्षिण दौऱ्यातील वेळापत्रकात बदल केला. तसेच या दौऱ्यावर भारतीय संघ फक्त कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार असल्याचं जाहीर केलं. याचबरोबर टी-20 मालिकेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असंही बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये पार पडणार होता. परंतु, ओमायक्रॉनमुळं मालिका पुढे ढकलण्यात आली.


कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला कसोटी सामना – 26 ते 31 डिसेंबर (सेंचूरियन)
दुसरा कसोटी सामना – 3 ते 7 जानेवारी (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना – 11 ते 15 जानेवारी (केप टाऊन)


कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ-
विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रिद्धिमान साहा (विकेटकिपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-