Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. वेस्टइंडीजविरुद्धच्या (Pakistan vs West Indies) तिसऱ्या टी20 सामन्यात मोहम्मदने 87 धावांची विजयी खेळी करत एक इतिहास रचला. मोहम्मदने टी20 क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात 2000 रन पूर्ण करत विश्वविक्रम केलं आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. 


रिझवानने वेस्टइंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 54 धावांवर असताना यंदाच्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. याआधी रिझवानने टी20 इंटरनेशनल सामन्यांमध्ये एका वर्षात 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केला होता. यावर्षी रिझवानचा बेस्ट स्कोर 104 धावा इतका होता. 2021 मध्ये टी20 इंटरनेशनल सामन्यात 29 मॅचमध्ये 73.66 च्या सरासरीने 134.89 च्या स्ट्राइक रेटने 1326 धावा बनवल्या आहेत. याशिवाय रिझवानने वर्षभरात 119 चौकार लगावले असून 42 षटकारही ठोकले आहेत. रिझवानने आतापर्यंत 13 अर्धशतकं लगावली आहेत.  


तिसऱ्य़ा सामन्यात पाकिस्तान विजयी


कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium) पार पडलेल्या तिसऱ्या टी20 मध्ये पाकिस्तानने वेस्टइंडीजला (Pakistan beats West Indies) सात विकेट्सने मात दिली. सामन्यात वेस्टइंडीजने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये तीन विकेट गमावत 207 रन केले. ज्यानंतर 18.5 ओव्हरमध्ये तीन विकेटच्या बदल्यात पाकने हे लक्ष्य पूर्ण केले आणि विजय मिळवला.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha