Domestic Cricket Tournament 2021 : स्थानिक क्रिकेट टूर्नामेंटमधील एक महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) भारताचे युवा फलंदाज आणि गोलंदाज धमाकेदार कामगिरी करत आहे. फलंदाजांमध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दमदार फलंदाजी करत असून गोलंदाजीमध्ये 5 गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली आहे. यामधध्ये स्टार स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टॉप असून त्याच्या प्रदर्शनावर एक नजर फिरवूया...
1. युझवेंद्र चहल - या टूर्नामेंटमध्ये हरियाणाकडून खेळणाऱ्या चहलने 5 सामन्यात 14 विकेट्स मिळवले आहेत. विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये चहल अव्वल आहे. दक्षिण आफ्रीका दौऱ्यात एकदिवसीय संघात चहलची निवड जवळपास निश्चित झाली आहे.
2. यश ठाकुर - या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे यश ठाकुर. विदर्भचा हा गोलंदाज आतापर्यंत 5 सामन्यात 14 विकेट्स मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
3. अनिकेत चौधरी - राजस्थानकडून खेळणाऱ्या चौधरीने 5 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. .त्याने या कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
4. चिंतन गाझा - विजय हजारे ट्रॉफीमध्ये गुजरातकडून खेळणाऱ्या चिंतनने 5 सामन्यात 13 विकेट्स घेतले असून त्याची गोलंदाजी यंदा अप्रतिम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
5. वॉशिंगटन सुंदर - भारतीय संघातील युवा खेळाडू सुंदर तामिळनाडू संघाकडून खेळत आहे. त्याने 5 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-
- SRH in IPL 2022: लिलावापूर्वीच हैदराबादच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, डेल स्टेन पुन्हा संघात परतणार, संघाच्या विजयात उचणार महत्वाचा वाटा
- BWF World Championships: पी.व्ही सिंधुची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, थायलँडच्या पोर्नपावी चोचुवँगचा केला पराभव
- Ashes Test Series 2021: चार फूट दूर जाणारा चेंडू एका हातानं पकडला, अॅशेस मालिकेत जॉस बटलरनं टीपला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha