एक्स्प्लोर

Suryakumad Yadav Injury : बांगलादेश मालिकेपूर्वी गंभीरची डोकेदुखी वाढली; भारताच्या टी-20 कर्णधार सोबत झाला मोठा गेम

Suryakumar Yadav Ruled Out of Duleep Trophy 2024 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका या महिन्यापासून सुरू होणार आहे. 

Suryakumad Yadav Injury : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका या महिन्यापासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे होणार आहे. सामन्याची तारीख जवळ आली आहे, परंतु बीसीसीआयकडून अद्याप टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. 

याआधी दुलीप करंडक स्पर्धा 5 सप्टेंबरपासून होणार आहे. दरम्यान, दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. बुची बाबूला स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती आणि सामन्याच्या शेवटच्या डावात तो फलंदाजीला आला नव्हता.

सूर्यकुमार यादव दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी सामन्यांच्या पहिल्या फेरीत खेळू शकणार नाही. सूर्याने कोईम्बतूर येथे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन विरुद्ध मुंबईसाठी बुची बाबू स्पर्धत खेळला. पण दुखापतीमुळे तो शेवटच्या दिवशी फलंदाजीला येऊ शकला नाही. 

सूर्याला 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान अनंतपूरमध्ये इंडिया सी विरुद्ध इंडिया डी विरुद्ध खेळायचे आहे. याआधी तो बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहे. भारत अ आणि भारत ब यांच्यातील सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

सूर्यकुमार यादवला खेळायची कसोटी क्रिकेट 

सूर्यकुमार यादवने अलीकडेच भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार का हा प्रश्न आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर निवड समिती संघ जाहीर करेल तेव्हाच मिळेल. 
पण कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळायचे आहेत. यामध्ये भारतीय संघाचे कर्णधारपदही सूर्यकुमार यादवकडेच राहणार आहे. 7 ऑक्टोबरपासून टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. तोपर्यंत सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानावर खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. जर तो फिट झाला नाही तर कोच गौतम गंभीरची डोकेदुखी वाढू शकते.

तयारीची संधी गमावली

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडल्यामुळे सूर्यकुमार यादवकडे तयारीची जी एक संधी होती ती नक्कीच गमावली आहे. असो, भारतीय खेळाडू सध्या विश्रांतीवर आहेत. मात्र, देशांतर्गत स्पर्धांमध्ये ते नक्कीच हात आजमावत आहेत. जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर ही मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होईल.  

हे ही वाचा -

Nitesh Kumar : रेल्वे अपघातात पाय गमावला, जिद्दीने लढला, नितेश कुमारने पॅरिसमध्ये फडकावला तिरंगा, जिंकले सुवर्णपदक

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget