T20 World Cup 2024 : स्वप्नांचा चक्काचूर! केएल राहुलसह 4 दिग्गजांना डच्चू
India T20 World Cup Squad: आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या 15 शिलेदारांची घोषणा कऱण्यात आली आहे.

India T20 World Cup Squad: आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या 15 शिलेदारांची घोषणा कऱण्यात आली आहे. शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांना संधी विश्वचषकात संधी मिळाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियामध्ये चार फलंदाज, चार अष्टपैलू, दोन विकेटकीपर, दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांना निवडले आहे. एक जून पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघ भिडणार आहे. पण काही खेळाडूंचं टी20 विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न भंगल आहे. शानदार कामगिरी केल्यानंतरही त्यांना टीम इंडियात स्थान मिलालं आहे. यामध्ये केएल राहुल, रिंकू सिंह, रवि बिश्नोई यासारख्या स्टार खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. आयपीएल संपल्यावर लगेचंच टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे टी-२० चे सामन्यांचे आयोजन होत आहे.
कोण कोणत्या खेळाडूंना डच्चू मिळाला -
शुभमन गिल, रिंकू सिंह, केएल राहुल, रवि बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना संघामध्ये निवडण्यात आले नाही. शुभमन गिल आणि रिंकू सिंह यांना राखीव खेळाडूमध्ये स्थान देण्यात आले आहे. रिंकू सिंह मागील दोन वर्षांपासून टीम इंडियाच्या टी 20 संघाचा नियमीत सदस्य राहिलाय, त्यानं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केले. पण आज त्याची निवड न झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. सोशल मीडियावर रिंकू सिंहची जोरदार चर्चा सुरु आहे.
केएल राहुलला डच्चू -
केएल राहुल याचाही पत्ता कट झाला आहे. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात केएल राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार होता, पण यंदा त्याला संघात स्थानही मिळवता आले नाही. राहुल याच्याऐवजी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली आहे. दोघांनीही शानदार कामगिरी केली आहे. केएल राहुल याच्या बॅटमधून धावा निघाल्या, पण त्याच्यासाठी संघात स्थान मिळालं नाही.
रवि बिश्नोई याचाही पत्ता कट -
रिंकू सिंह याच्याप्रमाणे मागील काही दिवसांपासून रवि बिश्नोई टी 20 संघाचा नियमित सदस्य राहिला. त्यानं प्रभावी कामगिरीही केली. पण त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. बीसीसीआयनं कुलच्यावर विश्वास दाखवलाय. कुलदीप आणि चहल यांच्या जोडीला अक्षर आणि रवींद्र जाडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रवि बिश्नोई याच्यासाठी संघात स्थान राहिलं नाही.
शुभमन गिल -
मर्यादीत षटकांच्या सामन्यात शुभमन गिल यानं शानदार कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले होते. पण आज त्याच्या पदरीही निराशाच पडली आहे. त्याला राखीव खेळाडूंमध्ये संधी मिळाली आहे, पण अंतिम15 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. यशस्वी जायस्वाल, विराट कोहली अथवा रोहित शर्मा यांना दुखापत झाली तरच गिल याला 15 जणांमध्ये स्थान मिळू शकते. अन्यथा गिल याला मैदानाबाहेरच बसावे लागणार आहे. त्याशिवाय श्रेयस अय्यर यालाही डावलण्यात आले आहे. ईशान किशन यााचाही पत्ता कट झाला आहे. अय्यर आणि ईशान किशन यांनी देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे बीसीसीआय त्यांच्यावर नाराज आहे, त्याचाच फटका बसल्याचं बोललं जात आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज





















