India Squad Australia T20’s: टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौरा करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. याच मालिकेसाठी भारतीय निवड समिती पुढच्या आठवड्यात संघाची घोषणा करण्याची माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय निवड समिती भारतीय संघासाठी पुढच्या आठवण्यात बैठक घेणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर 18 खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळू शकतं.
इनसाईट स्पोर्ट्स दिलेल्या माहितीनुसार, भारतीय निवड समिती पुढच्या आठवड्याच्या सुरुवातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची घोषणा करणार आहे. एवढंच नव्हे तर, आगामी टी-20 विश्वचषकासाठीही 16 सप्टेंबर अगोदर भारतीय संघ निवडला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघात सध्या कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.
रोहित शर्मासोबत केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता
भारताचा कर्णधार रोहित शर्मासह केएल राहुल सलामीला येऊ शकतो. तर, विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. हार्दिक पांड्या आणि रवींद्रा जाडेजा ऑलराऊंडर म्हणून भारतीय संघात असतील. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दिपक हुडाला बॅकअप ऑलराऊंडर म्हणून संघात स्थान दिलं जाऊ शकतं. युजवेंद्र चहललाही संघात स्थान मिळणं निश्चित मानलं जातंय. याशिवाय, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंहलाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात संधी मिळू शकते.
लवकरच बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा तिन्ही फॉरमेटमधील महत्वाचा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषकाला मुकण्याची चिंता व्यक्त केली जात होती. परंतु, तो दुखापतीतून सावरत असल्याची माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांसह भारतीय संघानंही सुटकेचा श्वास घेतलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपूर्वी तो पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
आर अश्विन आणि हर्षल पटेललाही मिळू शकते संधी
आर अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अक्षर पटेल आणि इशान किशन हे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतात. मात्र, या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणे खूप कठीण आहे.
हे देखील वाचा-