Indian Team Squad: न्यूझीलंडचा 17 नोव्हेंबरपासून भारत दौरा सुरू होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयनं न्यूझीलंड विरुद्धच्या टी- 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. विराट कोहली टी-20 विश्वचषकानंतर भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झालाय. ज्यामुळं रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. या दौऱ्यात व्यंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल यांना संधी देण्यात आलीय. याचबरोबर भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलचं संघात पुनारागमन झालंय.


मालिकेसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी-20 सामने पार पडणार आहेत. कोरोनामुळं भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. एवढंच नव्हेतर, कोरोनामुळे भारतात सर्वात लोकप्रिय असलेलं आयपीएलचं आयोजन देखील युएईत करावं लागतं होतं. 


न्यूझीलंड विरुद्ध भारताचा टी-20 संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकिपर), ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज. 


रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या 5 ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. यामुळं भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मा चांगल्याप्रकारे पार पाडू शकतो, अशा अनेकांचा विश्वास आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिकेत चांगली कामगिरी बजावेल, अशी अपेक्षा केली जातेय.


हे देखील वाचा-