Rohit Sharma new T20I Record: टी-20 विश्वचषकातील 42 व्या सामन्यात भारतानं नामिबियाला (IND vs NAM) 9 विकेट्स पराभूत केलंय. या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मानं आक्रमक फलंदाजी करीत नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात रोहित शर्मानं अर्धशतक झळकावलंय. या अर्धशतकाच्या कामगिरीसह रोहीत शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 हजार धावांचा टप्पा गाठलाय. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा तिसरा खेळाडू ठरलाय. तर, दुसरा भारतीय बनलाय.


या सामन्यात 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्मानं 31 बॉलमध्ये धडाकेबाज अर्धशतक झळकावलं. यात 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे. रोहित शर्माचं हे तिसरं अर्धशतक ठरलंय. या अर्धशतकासह रोहित शर्मानं दोन खास विक्रम त्याच्या नावावर केलं. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा रोहित शर्मा तिसरा खेळाडू ठरलाय. विराट कोहली (3227) आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिल (3115) नंतर रोहितने हा पराक्रम केलाय.


याशिवाय, या सामन्यात रोहित शर्मानं भागीदारीचा आणखी एक विक्रम केलाय. रोहित शर्मानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावांच्या भागीदारीच्या विक्रमाची बरोबरी केलीय. त्यानं केएल राहुलसोबत अकराव्यांदा पन्नास किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केलीय. याआधी हा विक्रम शिखर धवन- रोहित शर्मा या जोडीच्या नावावर होता.


दरम्यान, टी-20 विश्वचषकाच्या 42 व्या सामन्यात भारतीय संघानं नामिबिया संघाला धूळ चाखली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर नामिबियाच्या संघ डगमगताना दिसला. नामिबियानं या सामन्यात 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. नामिबियाच्या संघाने दिलेलं भारतानं 1 विकेट गमावून 15.2 व्या षटकातच पूर्ण केलंय.


हे देखील वाचा-