Rajvardhan Hangargekar: दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीची सध्या जोरदार चर्चा आहे. भारतीय संघातील सहा खेळाडू ऐनवेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतरदेखील भारतानं आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्ध मोठे विजय मिळवलेत. या विजयात मूळचा उस्मानाबादचा असलेल्या राजवर्धन हंगरगेकरचा मोलाचा वाटा आहे. अंडर-19 वर्ल्डकपमधील राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. त्यानं केवळ गोलंदाजीनंच नव्हेतर, फलंदाजीनंही प्रेक्षकांना आकर्षित केलंय. 


अंडर-19 वर्ल्डकपमध्ये आयर्लँड विरुद्ध 45 व्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या राजवर्धननं तुफानी खेळी केली. त्यानं 17 चेंडूंमध्ये नाबाद 39 धावा तडकवल्या. यात एक चौकार आणि पाच षटकार आहेत. त्यानं अखेरच्या षटकात सलग 3 षटकार ठोकून सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. राजवर्धनच्या फलंदाजीचा हा व्हिडिओ आयसीसीने ट्विट केला आहे.


आयसीसीचं ट्वीट-



राजवर्धन आष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या खेळात सातत्य असल्यानं त्याची भारतीय संघात निवड झाली. दु्र्देवाने राजवर्धनची क्रिकेटची आवड जोपसणारे वडिलांच कोरोनामुळे निधन झालंय. पण ज्यांच्यामुळं त्यानं क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं, त्याचे वडील हे यश पाहायला हवे होते, अशी भावना त्याच्या राजवर्धनच्या आईनं एबीपी माझाशी बोलून दाखवलीय.


युवराज सिंह, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, रिषभ पंत हे 19 वर्षे भारतीय संघातून खेळून पुढे स्टार झाले. मात्र, राजवर्धन आणि अभिषेक हे या वयातच परदेशातील मैदान गाजवत आहेत. खेळात सातत्य राहिले, फिटनेस राहिला तर हे दोघेही भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे. तसे झालं तर हा उस्मानाबाद सारख्या छोट्या शहरातल्या गुणवत्तेची मोठी ओळख ठरेल.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA