IND Vs SA Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 19 फ्रेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झालीय. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त असल्यानं त्याच्याऐवजी केएल राहुल (KL Rahul) एकदिवसीय संघाचं कर्णधारपद संभाळत आहे. तर, टेंबा बावुमा (Temba Bavuma) दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व करीत आहे. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 1-0 अशी आघाडी घेतलीय. एकिकडं मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, दुसरीकडं कसोटीप्रमाणे एकदिवसीय मालिकेतही विजयी रथ कायम राखण्याचा आफ्रिका प्रयत्न असेल. 


भारत आणि द. आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारी (शुक्रवार) खेळवला जात आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पर्लच्या बोलँड पार्क स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. तर, टॉस 1 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. भारत वि दक्षिण आफ्रिका पहिला वनडे सामना तुम्ही लाईव्ह स्‍टार स्‍पोर्ट्स 1/1 एचडी, स्‍टार स्‍पोर्ट्स 1 हिंदी/ 1 एचडी हिंदीवर पाहू शकता. भारत वि दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.


संघ-


भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, दीपक चहर, सूर्यकुमार यादव, , नवदीप सैनी, इशान किशन, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, रुतुराज गायकवाड


दक्षिण आफ्रिका संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), जेनेमन मलान, टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, सिसांडा मगला, झुबेर हमझा, काइल वेरेन


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha