एक्स्प्लोर

मोहम्मद नबीची झुंज, अफगाणिस्तानची 158 धावांपर्यंत मजल, अक्षर पटेलचा प्रभावी मारा

IND vs AFG Live Updates:  मोहाली येथील पहिल्या टी 20 सामन्यात अफगाणिस्तान संघाने (IND vs AFG) निर्धारित 20 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 158  धावांपर्यंत मजल मारली.

IND vs AFG Live Updates:  मोहाली येथील पहिल्या टी 20 सामन्यात अफगाणिस्तान संघाने (IND vs AFG) निर्धारित 20 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 158  धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी याने विस्फोटक फलंदाजी केली. नबीने 27 चेंडूत 42 धावांची खेळी केली. नजीबुल्लाह जादरान याने अखेरीस फिनिशिंग टच दिला. भारताकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी 159 धावांचे आव्हान मिळाले आहे. 

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या मैदानात अफगाणिस्तान संघाने संयमी सुरुवात केली. इब्राहिम जादरान आणि रहमानुल्लाह गुरबाज यांनी 50 धावांची सलामी दिली. कर्णधार जादरान याने 22 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. तर गुरबाज याने 28 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 23 धावांची खेळी केली. अजमतुल्लाह उमरजई याने तिसऱ्या क्रमांकावर संयमी आणि महत्वाची खेळी केली. पण रहमत शाह बाद झाल्यामुळे अफगाणिस्तानची धावगती मंदावली होती. रहमत शाह याला फक्त तीन धावाच करता आल्या. 

अफगाणिस्तानचा फिनिशिंग टच -

झटपट तीन विकेट गेल्यानंतर अनुभवी मोहम्मद नबी याने अजमतुल्लाह उमरजई याच्या साथीने डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. अफगाणिस्तानचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच मुकेश कुमार याने जोडी फोडली. अजमतुल्लाह उमरजई याला 29 धावांवर तंबूत पाठवले. तर मोहम्मद नबी यालाही 42 धावांवर बाद केले. अजमतुल्लाह उमरजई याने 22 चेंडूत एक षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. तर नबी याने 27 चेंडूत झटपट 42 धावा केल्या. यामध्ये तीन षटकार आणि दोन चैकारांचा समावेश होता. अखेरच्या दोन षटकांमध्ये नजीबुल्लाह जादरान याने झटपट धावा केल्या. त्याने चार चौकारांच्या मदतीने 19 धावांचे योगदान दिले. करीम जनत यानेही दोन चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्या. 

भारताची गोलंदाजी - 

भारताकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. शिवम दुबे याला एक विकेट मिळाली. रवि बिश्नोई, वॉशिंगटन सुंदर आणि अर्शदीप सिंह यांची विकेटची पाटी कोरीच राहिली.  

पहिल्या टी 20 सामन्यासाठी भारताची प्लेईंग 11 - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, शिव दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), रहमत शाह,अजमतुल्लाह उमरजई,मोहम्मद नबी,नजीबुल्लाह जादरान, करीम जनत,गुलबदीन नायब , फजलहक फारूकी,नवीन-उल-हक,मुजीब-उर-रहमान,

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget