South Africa vs India 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार फलंदाजी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी त्यांना विजयाकडे नेले. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला युवा फलंदाज तिलक वर्मा.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 219 धावा केल्या. यादरम्यान तिलक वर्माने 56 चेंडूत सर्वाधिक नाबाद 107 धावा केल्या. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिले शतकही ठरले. तिलक वर्माशिवाय अभिषेक शर्मानेही दमदार कामगिरी दाखवली. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने 25 चेंडूत 50 धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
दुसरीकडे भारताचा सलामीवीर संजू सॅमसन 2 चेंडूत एकही धाव न काढता बाद झाला. मात्र, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. सूर्यकुमार यादव 4 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. तर हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 18 धावा केल्या. रिंकू सिंगने पुन्हा एकदा फेल ठरला. रिंकू सिंग 13 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. रमणदीप सिंगने पदार्पणाच्या सामन्यात 6 चेंडूत 18 धावांची चांगली खेळी केली. त्याचवेळी अक्षर पटेल 1 चेंडूत 1 धावा काढून नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, अँडिले सिमेलेने आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय मार्को जॅनसेनला 1 यश मिळाले. तर जेराल्ड कोएत्झी, लुथो सिम्पाला आणि कर्णधार एडन मार्कहॅम यांना यश मिळाले नाही.
सेंच्युरियनमध्ये भारताचा पहिला विजय
220 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिका संघ 20 षटकात केवळ 208 धावा करू शकला आणि टीम इंडियाने 11 धावांनी सामना जिंकला. हेनरिक क्लासेन आणि मार्को जॅनसेन यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा दुसरा कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. मार्को जॅन्सनने 17 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 54 धावा केल्या. हेनरिक क्लासेननेही 22 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. कर्णधार एडन मार्करामनेही केवळ 29 धावांचे योगदान दिले आणि रीझा हेंड्रिक्स 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
दुसरीकडे, भारताकडून अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन फलंदाजांची शिकार केली. त्याचवेळी वरुण चक्रवर्तीने 2 फलंदाजांनाही आपले बळी बनवले. याशिवाय हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी 1-1 विकेट घेण्यात यश मिळविले. यासह सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. याआधी भारतीय संघ या मैदानावर 1 टी-20 सामना खेळला होता, त्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
हे ही वाचा -