Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
युवराज जाधव
Updated at:
13 Nov 2024 10:55 PM (IST)
1
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी 20 मॅच सुरु आहे. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 219 धावा केल्या. अभिषेक शर्माचं अर्धशतक आणि तिलक वर्माच्या शतकाच्या जोरावर भारतानं ही धावसंख्या केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिलक वर्मानं त्याच्या टी 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्यानं नाबाद 107 धावा केल्या.
3
तिलक वर्मानं त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार मारले.
4
टी 20 क्रिकेटमध्ये शतक करणारा तिलक वर्मा युवा खेळाडू ठरला आहे. त्यानं 22 वर्ष 5 दिवस इतकं वय असताना शतक झळकावलं.
5
तिलक वर्मानं या निमित्तानं सुरेश रैना आणि शुभमन गिलला मागं टाकलं. शुभमन गिलनं 23 वर्ष 146 दिवस वय असताना शतक केलं होतं. तर, सुरेश रैनानं 23 वर्ष 156 दिवस वय असताना शतक केलं होतं.