Tilak Varma Century Video Celebration Ind vs Sa 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात तुफानी फलंदाजी करताना तिलक वर्माने 51 चेंडूत शतक पूर्ण केले. तिलक वर्माचे हे टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक आहे. या शतकी खेळीत तिलक वर्माने 8 चौकार आणि 6 षटकारही मारले. याआधी तिलक वर्माने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. 22 वर्षीय तिलकर वर्मा हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तिलक वर्मा यांनी वयाच्या 22 वर्षे 5 दिवसात ही कामगिरी केली. शतकीय खेळी खेळल्यानंतर तिलक वर्माचा आनंद गगनात मावेना, सेलिब्रेशनचा भन्नाट व्हिडीओ एकदा पाहाच.
सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या T20I सामन्यात पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला. पहिल्या सामन्याचा शतकवीर संजू सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाल्याने पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिलक वर्मा नवा फलंदाज म्हणून मैदानात उतरला आणि सलामीवीर अभिषेक शर्माच्या साथीने त्यांनी केवळ डाव सांभाळला नाही. तिलक वर्माने डायनॅमिक शैलीत फलंदाजी करत 19व्या षटकात 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने पहिले T20I शतक झळकावून मोठी कामगिरी केली. शतक ठोकल्यानंतर तो मैदानात पळत सुटला.
T20I क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तिलक वर्मा भारताचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला. वयाच्या 22 वर्षे 5 दिवसात त्याने हा पराक्रम केला. यशस्वी जैस्वाल या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. जैस्वालने वयाच्या 21 वर्षे 279 दिवसांत नेपाळविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावून मोठी कामगिरी केली होती. टॉप-10 संघांविरुद्ध T20I शतक झळकावणारा तिलक हा सर्वात तरुण भारतीय फलंदाज आहे.
T20I शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू
21 वर्षे 279 दिवस - यशस्वी जैस्वाल विरुद्ध नेपाळ
22 वर्षे 005 दिवस - तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका*
23 वर्षे 146d - शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड
23 वर्षे 156d - सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका
सेंच्युरियन टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 220 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 2019 धावा केल्या. यादरम्यान तिलकसह अभिषेक शर्मानेही चांगली कामगिरी केली. त्याने 25 चेंडूत 50 धावा केल्या. अभिषेकने 5 षटकार आणि 3 चौकार लगावले.