South Africa vs India 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिलक वर्माची 107 धावांची शतकी खेळी आणि अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर तिसऱ्या टी-20 सामन्यात 220 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.




दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने 20 षटकांत 6 बाद 219 धावा केल्या. यादरम्यान, भारतीय खेळाडूंनी 13 षटकार आणि 15 चौकार मारले. भारतासाठी तिलक वर्माने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, ज्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. दक्षिण आफ्रिकेतर्फे अँडिले सिमलेने आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन, तर मार्को जेन्सेनला एक विकेट मिळाली.






प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीच्या षटकातच संजू सॅमसनची विकेट गमावली. सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात खातेही न उघडता बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक आणि तिलक वर्माने डावाची धुरा सांभाळली आणि दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक 25 चेंडूत 50 धावा करून बाद झाला.


तिलक वर्मा 56 चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 107 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने एका धावेचे, हार्दिक पंड्याने 18 धावांचे, रिंकू सिंगने आठ धावांचे आणि रमणदीप सिंगने 15 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी अक्षर पटेल एक धाव काढून नाबाद परतला.


हे ही वाचा -


Abhishek Sharma : 6,6,6,6,6.... अभिषेक शर्माने टीकाकारांना मैदानातच दिले सडेतोड उत्तर, 24 चेंडूत ठोकले अर्धशतक


Sanju Samson IND vs SA : 'हिरो' झाला 'झिरो', दोन शतके अन् नंतर सलग दोन बदक... 'ही' लाजिरवाणी कामगिरी करणारा संजू पहिला खेळाडू