Ind vs NZ 1st Test: न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय. दुखापतीमुळं भारताचा सलामीवीर केएल राहुल कसोटी मालिकेतून बाहेर झालाय. याबाबत बीसीसीआयनं माहिती दिलीय. त्याच्या जागेवर भारताचा युवा खेळाडू सुर्यकुमार यादवला संधी देण्यात आलीय.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघानं 3-0 फरकानं मालिका जिंकलीय. यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मात्र, यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसलाय. दुखापतीमुळं केएल राहुलला कसोटी मालिकेतून वगळण्यात आलंय. राहुलचे डाव्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळं त्याला सरावही करता येत नसल्यानं तो न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिका खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयनं दिलीय. त्याच्याऐवजी सुर्यकुमार यादवला संधी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. महत्वाचं म्हणजे, भारताचा सलामीवीर रोहत शर्मालाही कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आलीय. रोहित आणि राहुल दोघेही संघात नसल्यानं आता सलामीवीर म्हणून कोण उतरणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीसीसीआयचं ट्वीट-
सुर्यकुमारला संधी-
आयपीएलमध्ये बरीच वर्ष अप्रतिम कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान मिळालं. एकदिवसीय आणि टी-20 नंतर त्याला आता कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळालीय. सुर्यकुमारनं मर्यादीत षटकात चांगली कामगिरी करून दाखवलीय. यामुळं कसोटी सामन्यात काय कमाल करतोय? याकडं सर्वांच लक्ष लागलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील पाहा-