मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने आज (6 डिसेंबर) न्यूझीलंडला (India vs New Zeland) 372 धावांनी पराभूत केलं. भारतीय संघासाठी (Indian Team) हा इतिहासातील सर्वात मोठा कसोटी विजय आहे. त्यामुळे सेलिब्रेशनचा विषय तर आहेच, पण सोबतच आणखी एक आनंद साजरा करण्याचं कारण भारतीय संघाकडे आहे. भारतीय संघात सध्या खेळणाऱ्या 3 खेळाडूंसह एकूण 5 खेळाडूंचा आज वाढदिवस आहे. तर हे पाच खेळाडू म्हणजे, यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja), युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), करुण नायर (Karun Nayar) आणि माजी गोलंदाज आरपी सिंग (RP Singh).


एकाच दिवशी पाच भारतीय क्रिकेटर्सचा वाढदिवस असणं हा एक गोड योगायोग असल्याने आज सोशल मीडियावरही या सर्वांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC) यांनीही साऱ्यांबाबत ट्विट केले आहेत. विशेष म्हणजे या पाच पैकी तीन खेळाडू सध्या भारतीय संघातून खेळत असून तिघेही स्टार खेळाडू आहेत. तर माजी गोलंदाज आरपी सिंगने 2007 च्या टी20 विश्वचषकात भारताकडून महत्त्वाची कामगिरी केली होती. याशिवाय करुण नायर याला अजून भारतीय संघातून खास संधी मिळाली नसली तरी आयपीएलमध्ये (IPL) पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) त्याने काही खास खेळी खेळल्या आहेत.





इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha