Ajaz Patel World Record :  भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एकाच डावात 10 गडी बाद करत न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने विश्वविक्रम रचला आहे. वानखेडे स्टेडियमवर केलेल्या या विश्वविक्रमी कामगिरीनंतर एजाज पटेलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आता, एजाजचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोला सोशल मीडियावर युजर्सने दाद दिली आहे. 


फोटो आहे तरी काय?


एजाज पटेलने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे चार गडी बाद केले होते. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हॉटेलमध्ये परतण्याआधी एजाज हा वानखेडे स्टेडियमवर असलेल्या 'ऑनर बोर्ड'वरकडे पाहत होता. या ऑनर बोर्डवर वानखेडेच्या खेळपट्टीवर एकाच डावात पाच गडी बाद केलेल्या गोलंदाजांची नावे नोंदवण्यात आली आहे. 






या प्रतिष्ठेच्या फलकावर आपलेही नाव यावे यासाठी एजाजला एकच गडी बाद करायचा होता. मात्र, त्याने कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या फिरकीच्या तालावर भारतीय फलंदाजांना नाचवले. एजाजने बलाढ्य समजली जाणारी भारतीय फलंदाजी एक हाती तंबूत धाडली.  एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 गडींना बाद केलंय. यात त्यानं 12 षटकं निर्धाव टाकलीत. तर 2.49 च्या सरासरीनं 119 धावा दिल्या आहेत. 


एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा विक्रम आतापर्यंत तीन गोलंदाजांनी रचला आहे. इंग्लंडचे फिरकीपटू जिम लेकर, भारताकडून अनिल कुंबळे आणि न्यूझीलंडकडून एजाज पटेल यांनी ही किमया साधली आहे.  विशेष म्हणजे हे तिघेही फिरकीपटू आहेत.  


 इतर महत्त्वाच्या बातम्या:


IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत अनोखा विक्रम, 132 वर्षांपूर्वी दोन सामन्यात होते 4 कर्णधार


पाहा व्हि़डिओ: मुंबईकर एजाज पटेलची वानखेडेवर पटेली, 10 गडी बाद करत अनिल कुंबळेच्या विक्रमाशी केली बरोबरी