ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडवर (England) 9 विकेट्सनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ WTC Ranking अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणवत्ता यादीत थेट दोन नंबरवर पोहोचला आहे. ज्यामुळे भारत तिसऱ्या स्थानावर खाली घसरत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. मागील वर्षीपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC स्पर्धा खेळवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या होणारे सर्व आंतरराष्ट्रीय कसोटी सामने हे या स्पर्धेत विजयासाठीच खेळवले जात आहेत. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यासाठी संघाला त्यांच्या वर्षभरातील कसोटी सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करुन जिंकण्याची टक्केवारी सर्वाधिक ठेवावी लागते.


दरम्यान मागील WTC नंतर भारताने आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये इंग्लंडविरुद्ध 4 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. ज्यातील 3 सामने जिंकत, 2 ड्रॉ आणि एक भारत पराभूत झाला आहे. त्यामुळे भारताची विजयी होण्याची टक्केवारी 58.33 टक्के आहे. तर श्रीलंका संघाने 2 पैकी 2 सामने जिंकल्यामुळे त्यांची विजयी होण्याची टक्केवारी 100 टक्के आहे. ज्यानंतर आता ऑस्ट्रेलिया WTC च्या यंदाच्या वर्षातील पहिलाच सामना जिंकत त्यांनीही विजयी होण्याची टक्केवारी 100 टक्के करत दुसरं स्थान पटकावलं आहे. तर पाकिस्तान संघाने 4 पैकी 3 सामने जिंकले असून एक सामना पराभूत झाल्यामुळे त्यांची विजयी होण्याची  75 टक्के  आहे. त्यामुळे हे तिघेही अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असून भारत चौथ्या स्थानी आहे.



असा झाला Ashes चा पहिला सामना


सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला होता. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 147 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने पाच बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिला डावात धावांचा डोंगर उभारला. ट्रेव्हिस हेडने 152 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 425 धावा उभारत 278 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव ऑस्ट्रेलियाने 297 धावांवर गुंडाळला. ज्यामुळे विजयासाठी आवश्यक केवळ 20 धावा इंग्लंडने एक विकेट गमावत पूर्ण केल्या आणि सामना 9 विकेट्सनी जिंकला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha