ब्रिस्बेन : बहुचर्चित अशा अॅशेस मालिकेला अखेर सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडवर (England) दमदार असा विजय मिळवला आहे. 9 विकेट्सनी कांगारुनी सामना जिंकताना त्यांच्या एका खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली आहे. नेथल लियॉन (Nathan Lyon) असं या खेळाडूचं नाव असून लियॉनने सामन्यात 4 विकेट्स घेत कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा मोठा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला असून याआधी ग्लेन मॅक्ग्राथ आणि शेन वॉर्न यांनी ही कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावातील लियॉनच्या अप्रतिम गोलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला.



नेथनच्या कारकिर्दीवर एक नजर


ऑस्ट्रेलियाकडून नेथन लियॉनने 400 विकेट घेण्याची कामगिरी अवघ्या 101 कसोटी सामन्यात केली आहे. त्याने 2011 मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध डेब्यू सामना खेळला होता. नेथन लियॉनने टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या पहिल्याच चेंडूवर महान गोलंदाज कुमार संगकाराला बाद केलं होतं. त्याने टेस्ट करियरमध्ये एका डावात 18 वेळा 5 विकेट्स घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात नेथन लियॉनच्या पुढे केवळ शेन वार्न  (708 विकेट) आणि ग्लेन मॅक्ग्राथ (641 विकेट) हे दोनच खेळाडू आहेत.


असा झाला सामना


सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला होता. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 147 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने पाच बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिला डावात धावांचा डोंगर उभारला. ट्रेव्हिस हेडने 152 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 425 धावा उभारत 278 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव ऑस्ट्रेलियाने 297 धावांवर गुंडाळला. ज्यामुळे विजयासाठी आवश्यक केवळ 20 धावा इंग्लंडने एक विकेट गमावत पूर्ण केल्या आणि सामना 9 विकेट्सनी जिंकला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha