Indian ODI Team vice captain:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) रोहित शर्माची (Rohit Sharma) भारतीय एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमणूक केलीय. तर, विराट कोहलीला (Virat Kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम ठेवण्यात आलंय. मात्र, यानंतर भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार कोण? याबाबत चर्चा सुरु झालीय. एकदिवसीय संघाच्या उपकर्णधाराच्या शर्यतीत केएल राहुल (KL Rahul), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आहेत. परंतु, या यादीत केएल राहुलचं पारडं जड दिसत असून त्यालाचा उपकर्णधाराची जबाबदारी मिळण्याची अधिक शक्यता आहे.


केएल राहुल
केएल राहुल भारतीय टी-20 संघाचं उपकर्णधार आहे आणि त्यानं आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाचं नेतृत्व केलंय. तसेच केएल राहुल एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. त्यानं पंजाबकडून खेळत असताना चाहत्यांना प्रभावित केलंय. अशा परिस्थितीत आता एकदिवसीय फॉर्मेटमध्येही त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.


ऋषभ पंत
केएल राहुलप्रमाणेच भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत हा देखील एकदिवसीय संघाचा उपकर्णधार पदासाठी दावेदार आहे. ऋषभ पंत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जागा चालवू शकतो. त्याला विकेटच्या मागून खेळाची चांगली जाण आहे. याशिवाय, त्यानं दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं नेतृत्व केलंय. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघानं मागील दोन हंगामात चांगली कामगिरी करून दाखवली आहे.


श्रेयस अय्यर
श्रेय्यस अय्यर हा देखील एकदिवसीय संघाचा उपकर्णधार होण्याचा तिसरा दावेदार आहे. दुखापतीनंतर अय्यरनं शानदार पुनरागमन केलंय. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीनं 2020 मध्ये आयपीएलच्या अंतिम सामना खेळला होता. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha