Vijay Hazare trophy 2021: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून ( CSK) तुफानी फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) विजय हजारे ट्रॉफीत चमकदारी कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्र संघाचं (Maharashtra Cricket Team) नेतृत्व करणाऱ्या ऋतुराजनं सलग तीन सामन्यात शतक झळकावलंय. त्यानं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि केरळच्या संघाविरुद्ध हा पराक्रम केलाय. 


विजय हजारे स्पर्धेत ऋतुराज पहिल्यांदाच महाराष्ट्राचं नेतृत्व करीत आहे. कर्णधार म्हणून ऋतुराजनं गेल्या दोन सामन्यात महाराष्ट्राला विजय मिळवून दिला आणि शतकासह विजयाच महत्त्वाचा वाटा देखील उचलला आहे. ऋतुराजचं विजय हजारे स्पर्धेतील गेल्या तीन सामन्यात शतक केलंय. त्यानं मध्य प्रदेशविरुद्ध 112 चेंडूत 136 धावा केल्या आणि छत्तीसगड विरुद्ध नाबाद 154 धावांची खेळी केलीय. तर  केरळविरुद्धच्या सामन्यात त्यानं 124 चेंडूत 129 धावा केल्या. यात 9 चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. 


भारताचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2021मध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळताना त्यानं सर्वाधिक 635 धावा केल्या होत्या. चेन्नईच्या विजयात ऋतुराजची महत्वाची भूमिका होती. त्यानं फाफ डुप्लेसिस सोबत चेन्नईला चौथे विजेतेपद मिळून देण्यात मोठा हातभार लावलाय. यामुळंच चेन्नईच्या संघानं ऋतुराजला पुढील हंगामासाठी रिटेन देखील केलंय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-