Points Table : अफगाणिस्तानचा धुव्वा, पाकिस्तानला फटका, गुणतालिकेत भारत दुसऱ्या क्रमांकावर
World Cup 2023 points table : रोहित शर्माच्या भारतीय संघानं विश्वचषकाच्या मोहिमेत सलग दुसरा विजय साजरा केला आहे.
World Cup 2023 Points Table : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून धुव्वा उडवला. भारताचा हा विश्वचषकातील सलग दुसरा विजय होय. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या विजयाचे हिरो ठरले. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे भारतीय संघाने गुणतालिकेत पाकिस्तानला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने प्रत्येकी दोन दोन सामने जिंकले आहेत. पण न्यूझीलंडचा नेटरनरेट चांगला असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. विराट विजयामुळे भारतीय संघाचा नेटरनेरटही सुधारला आहे. भारतीय संघाचा नेटरनरेट + 1.5 इतका झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तानचा रनरेट 0.9 इतका आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा नेटरनेरट + 2 पेक्षा जास्त आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा फक्त एक सामना झालाय. ते दोन गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहेत.
इंग्लंडचा संघ दोन सामन्यात एक विजय एक पराभवासह पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर विराजमान आहे. बांगलादेश संघालाही एक विजय आणि एक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेचं खातेच उघडले नाही -
पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि एक वेळा चषक उंचावणारा श्रीलंका यांना विजयाचे खाते अद्याप उगडता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ सातव्या स्थानावर आहे. तर श्रीलंका संघाला आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंका संघ आठव्या स्तानावर आहे. अफगाणिस्तान नवव्या आणि नेदरलँड दहाव्या स्थानावर आहे. नेदरलँड संघालाही दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
भारताचा मोठा विजय, अफगाणिस्तानचा केला पराभव -
रोहित शर्माच्या भारतीय संघानं विश्वचषकाच्या मोहिमेत सलग दुसरा विजय साजरा केला आहे. भारतानं दिल्लीतल्या सामन्यात अफगाणिस्तानचा आठ विकेट्स आणि 90 चेंडू राखून धुव्वा उडवला. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 273 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण रोहित शर्माचं खणखणीत शतक आणि त्यानं ईशान किशनच्या साथीनं दिलेली 156 धावांची दणदणीत सलामी यांच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव केला. विराट कोहलीनंही लागोपाठ दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरं केलं. त्यानं 56 चेंडूंत नाबाद 55 धावांची खेळी केली. त्याआधी, अफगाणिस्ताननं या सामन्यात 50 षटकांत आठ बाद 272 धावांची मजल मारली होती. हाशमतुल्ला शाहिदी आणि आझमतुल्ला ओमरझाईनं चौथ्या विकेटसाठी रचलेली 121 धावांची भागीदारी अफगाणिस्तानच्या डावात मोलाची ठरली. कर्णधार शाहिदीनं आठ चौकार आणि षटकारासह ८० धावांची खेळी उभारली. ओमरझाईनं दोन चौकार आणि चार षटकारांसह 62 धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराह याने चार विकेट घेतल्या होत्या. तर हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.