WTC Points Table : WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीसाठी कोण-कोण शर्यतीत, वाचा सविस्तर
WTC Final: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरा सामना जिंकॉल्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ WTC फायनलमध्ये पोहोचला असून दुसरा संघ कोणता जाणार यासाठाी श्रीलंका आणि भारत यांच्यात सर्वाधिक चुरस आहे.
WTC Points table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा (World Test Championship) आता शेवटच्या टप्प्यांत पोहोचली आहे. या चॅम्पियनशिप अंतर्गत 6 संघांमध्ये अजून चार सामने खेळायचे आहेत. या महिन्यात हे चार सामने होणार असून या सामन्यांनंतर WTC फायनलचा दुसरा संघ कोणता? हे निश्चित होणार आहे. इंदूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने आधीच WTC फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता दुसरा संघ कोण असेल, याचा निर्णय 9 ते 14 मार्च या कालावधीत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांनंतरच होणार आहे.
9 मार्चला एकीकडे जिथे भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमनेसामने येणार आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. या दोन सामन्यांचे निकाल मुख्यत्वे WTC च्या दुसऱ्या अंतिम फेरीतील संघ कोणता? हे ठरवतील. या दरम्यान, WTC अंतर्गत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक कसोटी सामना देखील खेळला जाईल, परंतु हे दोन्ही संघ WTC अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर असल्याने, या सामन्याच्या निकालाचा WTC फायनलवर परिणाम होणार नाही.
आता केवळ दोनच संघ शर्यतीत
WTC फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनण्यासाठी टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात फक्त स्पर्धा आहे. अहमदाबाद येथे होणार्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील शेवटचा सामना भारतीय संघाने जिंकला तर तो थेट डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचेल, पण जर हा सामना अनिर्णित राहिला किंवा भारतीय संघ हरला, तर अशावेळी श्रीलंकेलाही WTC आहे. फायनलमध्ये पोहोचण्याची संधी असेल. या स्थितीत श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवावा लागेल. जर श्रीलंकेला हे करता आले नाही, तर अहमदाबाद कसोटी गमावूनही भारतीय संघ WTC फायनलमध्ये पोहोचेल. तर सध्या नेमकी WTC गुणतालिका कशी आहे. ते पाहूया...
संघ | विजय | पराभव | अनिर्णीत | एकूण गुण | विजयी टक्केवारी |
1. ऑस्ट्रेलिया | 11 | 3 | 4 | 148 | 68.52 |
2. भारत | 10 | 5 | 2 | 123 | 60.29 |
3.श्रीलंका | 5 | 4 | 1 | 64 | 53.33 |
4. दक्षिण आफ्रीका | 7 | 6 | 1 | 88 | 52.38 |
5. इंग्लंड | 10 | 8 | 4 | 124 | 46.97 |
6. वेस्ट इंडीज | 4 | 5 | 2 | 54 | 40.91 |
7. पाकिस्तान | 4 | 6 | 4 | 64 | 38.10 |
8. न्यूझीलंड | 2 | 6 | 3 | 36 | 27.27 |
9. बांगलादेश | 1 | 1 | 10 | 16 | 11.11 |
बॉर्डर गावस्कर मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेत (BGT 2023) टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला चौथा सामना जिंकावा लागेल किंवा बरोबरीत सोडवावा लागेल. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. भारतीय संघ चौथी कसोटी हरला तर श्रीलंका आणि न्यूझीलंड (SL vs NZ) यांच्यातील कसोटीच्या निकालावर संघाला अवलंबून राहावे लागेल.
हे देखील वाचा-