India A Announced : भारत विरुद्ध न्यूझीलंड 'अ' संघाची एकदिवसीय मालिका, संजू सॅमसन करणार नेतृत्त्व
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्या 'अ' संघामध्ये 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
India A vs New Zealand A : भारतीय संघ (Team India) 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) टी20 मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी भारताचा 'अ' संघ न्यूझीलंडच्या 'अ' संघाशी सामना खेळणार आहे. यासाठी संजू सॅमसन कर्णधार असणार असून पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर हे दिग्गजही संघात असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्या 'अ' संघामध्ये 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
भारताने न्यूझीलंडविरुद्ध उतरवणाऱ्या या 'अ' संघाचा विचार करता या संघाचं नेतृत्त्व देण्यात आलेल्या संजूला भारतीय टी20 विश्वचषकाच्या संघात न घेतल्याने बरेच चाहते बीसीसीआयवर टीका करत आहेत. याशिवाय पृथ्वी, कुलदीप, शार्दूल या दिग्गजांचीही चर्चा असून यांनाही अ संघात संधी मिळाली आहे. याशिवाय आयपीएल 2022 मध्ये चमकलेले राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, केएस भरत, शाहबाज अहमद, तिलक वर्मा, कुलदीप सेन, उम्रान मलिक अशा बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
कसा आहे संघ -
पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईस्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दूल ठाकूर, उम्रान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा
NEWS - India "A" squad for one-day series against New Zealand "A" announced.
— BCCI (@BCCI) September 16, 2022
Sanju Samson to lead the team for the same.
More details here 👇👇https://t.co/x2q04UrFlY
कसं आहे वेळापत्रक?
दिवस | तारीख | सामना | ठिकाण |
गुरुवार | 22 सप्टेंबर | पहिला एकदिवसीय सामना | एम.ए. चिंदबरम स्टेडियम, चेन्नई |
रविवार | 25 सप्टेंबर | पहिला एकदिवसीय सामना | एम.ए. चिंदबरम स्टेडियम, चेन्नई |
मंगळवार | 27 सप्टेंबर | पहिला एकदिवसीय सामना | एम.ए. चिंदबरम स्टेडियम, चेन्नई |
हे देखील वाचा-