IND W vs WI W: एकीकडे भारताच्या अंडर 19 महिला संघाने (U19 Team india) विश्वचषक उंचावला असून दुसरीकडे वरिष्ठ महिला क्रिकेटसंघही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 त्रिकोणी मालिका खेळवली जात आहे. यामध्ये टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. आता अंतिम सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी (india vs south africa) होणार आहे. हा सामना ईस्ट लंडनमध्ये खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी शानदार खेळी केली. तर दीप्ती शर्माने तीन बळी घेतले. तिलाच प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.






सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारताला 95 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने 13.5 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज सलामीला आल्या. मंधाना अवघ्या 5 धावा करून बाद झाली. जेमिमाने 39 चेंडूंचा सामना करत नाबाद 42 धावा केल्या. त्याने 5 चौकारही मारले. हरलीन देओल 13 धावा करून बाद झाली. हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. तिने 23 चेंडूंचा सामना करत नाबाद 32 धावा केल्या. त्यात 4 चौकारांचाही समावेश होता.


वेस्ट इंडिजकडून हेली मॅथ्यूजने 34 धावांचे योगदान दिले. जेम्सने 21 धावांचे योगदान दिले. ती नाबाद राहिली. यादरम्यान दीप्तीने टीम इंडियाकडून 3 विकेट घेतल्या. तिने 4 षटकात 11 धावा देत 2 मेडन षटकंही तिने टाकली. पूजा वस्त्राकरने 4 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले. गायकवाडलाही यश मिळालं. तिने 4 षटकात 9 धावा दिल्या आणि एक मेडन ओव्हर टाकली. रेणुका सिंगला एकही विकेट मिळाली नाही. तिने 4 षटकात 22 धावा दिल्या.


भारताचा दमदार फॉर्म


या त्रिकोणी मालिकेतील भारताचा प्रवास अगदी वाखाणण्याजोगा होता. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 27 धावांनी पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 56 धावांनी पराभव झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना निकालाविना राहिला. त्याचवेळी, यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा आज पुन्हा पराभव केला. आता 2 फेब्रुवारीला अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत सामना खेळणार आहे.


हे देखील वाचा-