Hockey Team India Coach Graham Reid Resigned : हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेचं (Hockey World Cup 2023) यंदाचं यजमानपद भारताकडे असूनही भारतीय संघ क्वॉर्टर फायनलमध्येही पोहचू शकला नाही. यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा (Graham Reid resigned) दिला आहे. याबाबतची माहिती हॉकी इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केली आहे. रीड यांनी सोमवारी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तारकी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.


भारतात या वर्षी हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. ओडिशामध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात टीम इंडिया संयुक्तपणे 9व्या क्रमांकावर राहिली.  अंतिम सामना जर्मनीने जिंकत विश्वचषक उंचावला, त्यांनी बेल्जियमचा पराभव केला.


मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्यासह विश्लेषणात्मक प्रशिक्षक ग्रेग क्लार्क आणि वैज्ञानिक सल्लागार मायकल डेव्हिड यांनीही राजीनामा दिला आहे. तिघेही त्यांचा नोटिस कालावधी पूर्ण करणार आहेत. रीडसोबत हा सपोर्ट स्टाफ 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक दरम्यान टीम इंडियासोबत होता. टीम इंडियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. यानंतर 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले. टीम इंडियाने हॉकी प्रो लीग 2021/22 मध्ये तिसरे स्थान मिळविले. ज्यामुळे पाहिले गेले तर रीड हे संघाचे यशस्वी प्रशिक्षक राहिले आहेत. पण विश्वचषकात खराब कामगिरीनंतर मात्र रीड यांनी राजीनामा दिला आहे.


जर्मनीनं उंचावला कप


यंदा भारतात विश्वचषक असूनही भारत खास कामगिरी करु शकला नाही. हॉकी वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया 9व्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा समावेश डी पूलमध्ये करण्यात आला होता. यामध्ये त्याने 3 सामने खेळले. यादरम्यान 2 सामने जिंकले. एका सामन्यात पराभवाचा सामना करताना. या गटात इंग्लंड अव्वल स्थानी आहे. इंग्लंडने 3 पैकी 2 सामने जिंकले. पण त्यांची एकूण गोल जास्त होती. जर स्पर्धेच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर तो जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात खेळला गेला. पूर्ण वेळेपर्यंत सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. पण जर्मनीने पेनल्टी शूटआऊट जिंकल्यानंतर सामनाही जिंकला. तर दुसरीकडे 9व्या स्थानासाठी टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेशी लढत होती. भारताने त्यांचा 5-2 असा पराभव करत नववं स्थान मिळवलं.


हे देखील वाचा-