Team India for IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिका अतिशय रोमांचक वळणावर आली आहे. एकदिवसीय मालिकेतील (IND vsNZ ODI Series) सर्व सामने गमावलेल्या किवी संघाने रांचीमध्ये विजयासह T20I मालिकेची सुरुवात केली, पण लखनौमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पुनरागमन करत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. आता बुधवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला या मालिकेतील निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान या महत्त्वाच्या तिसऱ्या T20 मध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये भारत काही बदल करतो का हे पाहावे लागेल.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात प्लेईंग इलेव्हनची निवड करणं हार्दिक पांड्यासाठी सोपं नसेल. या मालिकेसाठी पृथ्वी शॉ दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात परतला होता, मात्र कर्णधार हार्दिकने अद्याप त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेलं नाही.
शुभमन आणि ईशान सतत फ्लॉप
हार्दिकने शॉ ऐवजी एकदिवसीय सामन्यांमध्ये सतत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला पसंती दिली होती. मात्र, गिल या फॉरमॅटमध्ये चमत्कार करू शकलेला नाही. या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये गिलने केवळ 9 च्या सरासरीने 18 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, ईशान किशनची बॅटही शांत झाली आहे. किशनने या मालिकेत आतापर्यंत 11.50 च्या सरासरीने 23 धावा केल्या आहेत.
राहुल त्रिपाठीच्या जागी जितेश शर्माला संधी मिळेल का?
या मालिकेसाठी पहिल्यांदाच यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. अशा स्थितीत निर्णायक सामन्यात हार्दिक जितेशला अंतिम 11 मध्ये स्थान देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय उमरान मलिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर संघात परतणार की नाही, हेही पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या निर्णायक सामन्यात कॅप्टन हार्दिक कोणा-कोणाला संधी देतो हे पाहावं लागेल.
भारतीय संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), पृथ्वी शॉ, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
हे देखील वाचा-