CM Eknath Shinde : खेळाडूंना योग्य संधी मिळाल्यास स्थानिक मैदानावरुनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. आपल्या मुलांमधील क्रीडा गुणांना वाव द्यायला हवा. तसेच खेळांना प्राधान्य देऊन, खेळाडूंना योग्य संधी मिळवून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. पुणे महानगर पालिकेच्यावतीनं हांडेवाडी रोड, महम्मदवाडी येथे उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाच्या लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
आमचं सरकार हे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे सरकार असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. राज्याच्या तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करु. राज्यातील अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच इतर भागात जाऊन पाहणी केली आहे. अतिवृष्टीमुळं जीवितहानी, वित्तहानीचा आढावा घेतला असून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. विभागस्तरावर जाऊन शेतीचं नुकसान, पिकांचे प्रश्न, विकासाचे प्रकल्प आदींबाबत आढावा घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी शिंदे यांच्या हस्ते महानगर पालिकेच्यावतीनं सुमारे चार कोटी रुपये खर्चून उभारणी केलेल्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आलं. मैदानाच्या उभारणीमध्ये काम केलेले कंत्राटदार, मनपा अभियंते यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार दिलीप लांडे, शरद सोनवणे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त विलास कानडे, माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. काल त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच त्यांनी विविध नेत्यांच्या गाठीभेटी देखील घेतल्या. त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध विकास काम आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंग्याचं नियोजन केलं. अनेक योजनांचा फायदा झाला पाहिजे. केंद्राकडून राज्यांच्या योजनांना मदत मिळेल. या सगळ्यांना गती देण्याचं काम झालं पाहिजे याबाबत चर्चा केली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde In Pune: संजय राऊतांच्या घरी पैसे सापडले ते माझ्या घरी सापडले नाहीत; मुख्यमंत्री संतापले
- Eknath Shinde, Aditya Thackeray In Pune: एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पुण्यात आमने-सामने? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण