IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारत 7 विकेट्सनी जिंकला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताने 164 धावांवर वेस्ट इंडीजला रोखलं. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या तुफान अर्धशतकासह (76) पंतच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

IND vs WI 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकून भारताने सामना जिंकला आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवने कमाल फलंदाजी केली. 
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 164 धावांवर रोखलं. ज्यामुळे विजयासाठी भारताला 20 षटकात 165 धावा करायच्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या 76 धावांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केलं.
  3. सामन्यात सर्वप्रथम म्हणजे नाणेफेक जिंकत प्रथम भारताने गोलंदाजी घेतली.
  4. वेस्ट इंडीजला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती भारताने आखली होती. पण वेस्ट इंडीजकडून काईल मायर्स याने एकहाती झुंज देत अखेरपर्यंत संघाचा डाव सावरला. त्याने 50 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या.
  5. त्याच्याशिवाय इतर फलंदाजांनी खास कामगिरी केली नाही. पण वेस्ट इंडीज एक तगडं आव्हान भारतासमोर ठेवू शकली.
  6. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन तर हार्दीक आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
  7. 165 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा 11 धावा करुन दुखापतीमुळे तंबूत परतला.
  8. त्यानंतर श्रेयस अय्यर (24) आणि पंत (33) यांनी सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.
  9. 44 चेंडूत 76 धावा ठोकून तो बाद झाला, पण त्याने भारताला विजयाजवळ नेऊन ठेवलं. पंतने नाबाद 33 धावा ठोकत भारताचा विजय पक्का केला.
  10. या विजयामुळे भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर पोहोचला आहे.