IND Vs WI: सराव सामन्यात यशस्वी चमकला; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्णाची संधी मिळणार?
IND Vs WI: वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यांआधी यशस्वी जयस्वालने त्याच्या दमदार कामगिरीने लक्ष वेधलं आहे. त्यामुळे यशस्वीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच पदार्पण होण्याची शक्यता आहे.
![IND Vs WI: सराव सामन्यात यशस्वी चमकला; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्णाची संधी मिळणार? IND Vs WI yashasvi jaiswal scrored 54 runs in practice match for west indies series detail marathi news IND Vs WI: सराव सामन्यात यशस्वी चमकला; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्णाची संधी मिळणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/29/453cd4f84143d9c383007f14a08469041685333816864344_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND Vs WI: भारत (India) आणि वेस्ट इंडिजमध्ये (West Indies)12 जुलैपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच या कसोटी सामन्यांमध्ये युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashasvi jaiswal) याचं पदार्पण होण्याची शक्यता आहे. यशस्वी जयस्वालने यंदाच्या आयपीएलच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. तसेच त्याने त्याच्या कामगिरीच्या मालिकाचे वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये सातत्य ठेवले आहे. वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यांमध्ये यशस्वीने 54 धावांची खेळी केली आहे.
चेतेश्वर पुजाराच्या जागी यशस्वीला भारतीय संघात निवडण्यात आले आहे. खरंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयने भविष्यातील भारतीय संघाची बांधणी करण्यात सुरुवात केली आहे. जयस्वाल सोबत ऋतुराज गायकवाडची देखील भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. परंतु पदार्पणाच्या शर्यतीत जयस्वालने ऋतुराजला मागे पाडल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे.
जर यशस्वी जयस्वालला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली तर त्याला सलामीची धुरा सांभाळण्याची संधी मिळणार आहे. तसेच शुभमन गीलला तिसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी उतरवण्यात येईल. मधल्या फळीतील काही अनुभवी खेळाडू देखील लवकरच निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुभमनला अशा परिस्थितीत मधली फळी सांभळण्याची जबाबदारी मिळू शकते. सध्या भारतीय संघात चौथ्या स्थानावर विराट कोहली आणि पाचव्या स्थानावर अजिंक्य राहणे खेळत आहेत.
ईशान किशनला देखील मिळणार संधी
वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यांमध्ये भारतीय संघात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मालिकेमध्ये ईशान किशन हा यष्टिरक्षकासोबत फलंदाजी करताना पाहायला मिळू शकतो. तसेच के एस भरतला संघाबाहेर बसवण्यात येऊ शकते. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये भरतची कामगिरी ही जेमतेमच राहिली आहे.
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या काही युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. यामध्ये यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. यशस्वी जयस्वाल याने आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघासाठी प्रभावी कामगिरी केली होती, तर मुंबईसाठी तिलक वर्मा संकटमोचक झाला होता. या दोन खेळाडूंना संधी देत निवड समितीने मोठे पाऊल उचलले आहे.
त्याशिवाय पंजाबसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या विदर्भाच्या जितेश शर्मा याचीही निवड करण्यात आलेली नाही. भारतीय संघात चार वेगवान गोलंदाज निवडण्यात आले आहे. यामध्ये अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे.
हे ही वाचा :
विश्वचषकाआधीच बांगलादेशला धक्का, कर्णधाराने तडकाफडकी घेतली निवृत्ती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)