India vs West indies Ishan Kishan Rohit Sharma KL Rahul : भारत आणि वेस्टइंडिज (India vs West Indies) यांच्यामध्ये तीन सामन्याची एकदिवसीय मालिका अहमदाबादमध्ये सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारताने सहा गड्यांनी विजय मिळवला आहे. भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून इशान किशन आणि रोहित शर्माने सलामीची जबाबदारी पार पाडली होती. शिखर धवनला कोरोनाची लागण झाल्यामुळे इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळालं होतं. पण आता रोहितच्या जोडीला इशान किशन दिसणार नाही. कारण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उपकर्णधार के. एल राहुल (India vs West Indies) भारतीय संघत परतला आहे. घरगुती कारणामुळे राहुलने पहिल्या एकदिवसीय सामन्यातून माघार घेतली होती.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी के.एल राहुल, मयांक अग्रवाल आणि नवदीप सैनी भारतीय संघासोबत जोडले गेले आहेत. राहुल आणि मयांक यांनी सरावाला सुरुवातही केली. बीसीसीआयने सरावाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. राहुल, मयांक आणि नवदीप सैनी सराव करताना फोटोमध्ये दिसत आहे. दिल्लीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 29 वर्षीय नवदीप सैनीने गोलंदाजीचा कसून सराव केला. पाहा कोण आलेय? असे म्हणत बीसीसीआयने तिघांचे सराव करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.
रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला. हा सामना टीम इंडियासाठी दोन कारणामुळे खास होता, कारण नियमीत कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माची ही पहिलीच मालिका आहे. तर भारतीय संघाचा हा एक हजारावा सामना होता. त्यामुळे या सामन्यात भारताने विजय मिळवत आपला आत्मविश्वास वाढवलाय. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बदल होण्याची शक्यता आहे. कारण, उपकर्णधार राहुल आणि रोहित शर्मा सलामीला दिसू शकतात. तर इशान किशनला आराम दिला जाऊ शकतो.
संबधित बातम्या :
India vs Pakistan ticket : मौका मौका, मॅचपूर्वी वातावरण तापण्यास सुरुवात, तासाभरात सर्व तिकिटं संपली!
Watch Video : पाकिस्तानविरुद्धचा कसोटी सामना, दुसरा डाव अन् तब्बल 10 विकेट्स; 23 वर्षांपूर्वीचा अनिल कुंबळेचा ऐतिहासिक विक्रम
Virat-Rohit DRS : रोहित शर्मा -विराट कोहलीमध्ये वाद आहे? हा व्हिडीओ उघडेल तुमचे डोळे