On This Day Anil Kumble 10 wickets haul India vs Pakistan : अनिल कुंबळे म्हणजे, भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज नाव. भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेनं आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केले आहेत. कुंबळेनं ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक संघांविरोधातील सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली. पण कुंबळेचा एक विक्रम आजही क्रिडारसिकांच्या मनाचा ठाव घेतो. कुंबळेनं 23 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पाकिस्तान विरोधातील कसोटी सामन्यातील एका डावात 10 विकेट्स घेतले होते. याचा व्हिडीओही बीसीसीआयनं ट्वीट केला आहे. 


वर्ष 1999... पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतीय दौऱ्यावर होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. या कसोटी सामन्यातील दुसरा सामना 4 ते 7 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत खेळवण्यात येणार होता. टीम इंडियानं पहिल्या डावात सर्वबाद 252 धावा आणि दुसऱ्या डावात 339 धावांचा डोंगर पाकिस्तानसमोर रचला होता. भारतानं दिलेलं आव्हानं पेलत मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा पहिला डाव मात्र अवघ्या 172 धावांत आटोपला. तर दुसऱ्या डावात 207 धावांवर पाकिस्तानचा संघ माघारी परतला. 



कुंबळेनं पहिल्या डावांत 4 विकेट्स घेतले. त्यानं मोहम्मद यूसुफ आणि इंजमाम-उल-हक यांसारख्या दिग्गज खेळाडूंना माघारी धाडलं. पण दुसऱ्या डावात कुंबळेनं मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांना सळो की, पळो करुन सोडलं. दुसऱ्या डावात कुंबळेनं एक नाही, दोन नाही, तर तब्बल 10 फलंदाजांना माघारी धाडलं. कुंबळेनं एजाज अहमद, मोहम्मद यूसुफ आणि सकलॅन मुस्ताक यांसारख्या फलंदाजांना शून्यावर माघारी धाडलं. 


अनिल कुंबळेनं या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात 26.3 षटकात 74 धावा देत 10 विकेट्स घेतले. कुंबळेनं या डावात 9 षटकं निर्धाव टाकली. हा सामना भारतीय क्रिकेट संघानं 212 धावांनी जिंकला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha