'मियां, क्या कॅच लिया हैं!' मोहम्मद सिराजने हवेत झेपवून घेतला झेल, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
India vs West Indies Mohammed Siraj Ravindra Jadeja : डोमिनिका कसोटीसामन्याच्या पहिल्याच दिवशी मोहम्मद सिराजने याने जबराट झेल घेतला.
India vs West Indies Mohammed Siraj Ravindra Jadeja : डोमिनिका कसोटीसामन्याच्या पहिल्याच दिवशी मोहम्मद सिराजने याने जबराट झेल घेतला. सिराजने हवेत झेपवत घेतलेल्या कॅचची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सिराजने हेवत झेपवत भन्नाट झेल घेतला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. पहिल्याच दिवशी सिराजच्या फिल्डिंगचे कौतुक केले जातेय.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये डोमिनिका कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. 100 धावांच्या आत वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतलाय. पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज याने शानदार कॅच घेतला. रविंद्र जाडेजाच्या चेंडूवर ब्लॅकवूड याने जोरदार फटका मारला होता, पण सिराजने जबरदस्त झेल घेतला त्याला तंबूत पाठवले. बीसीसीआयने ट्वीट करत सिराजच्या झेलचे कौतुक केलेय.
डोमिनिका कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. एलिक अथानाजे याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलाडंता आली नाही. ब्लॅकवूड चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने 34 चेंडूत 14 धावांचे योगदान दिले. ब्लॅकवूड याने रविंद्र जाडेजा यांच्या चेंडूवर जोरदार फटका मारला... पण सिराज याने हवेत झेपवत त्याची खेळी संपुष्टात आली. सिराजच्या झेलचे कौतुक होत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
📸 📸
— BCCI (@BCCI) July 12, 2023
That MOMENT when @mdsirajofficial took a blinder of a catch 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/FWI05P4Bnd #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/reVWZJ4PHo
Is it a bird? It is a plane? It's Mohammed Siraj pic.twitter.com/YcAGD1WmxP
— sourav (@Purplepatch22) July 12, 2023
MOHAMMAD SIRAJ... YOU BEAUTY!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2023
What a screamer, excellent catch.pic.twitter.com/iAFMvHtUFl
Mohammad Siraj breaks the partnership to get Jason Holder. Brilliant from Siraj! pic.twitter.com/TUwGEj4nfC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2023
भारतीय गोलंदाजांचा दबदबा -
पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजासमोर वेस्ट इंडिजची फळी कोलमडली. वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. 122 धावांत वेस्ट इंडिजचे सहा फलंदाज बाद झाले आहेत. रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर सिराज आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.