एक्स्प्लोर

IND Vs WI 5th T20 : कोण जिंकणार मालिका? भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये जेतेपदासाठी लढाई

IND Vs WI 5th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज निर्णायक आणि अखेरचा टी20 सामना होणार आहे.

IND Vs WI 5th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज निर्णायक आणि अखेरचा टी20 सामना होणार आहे. पाच सामन्याच्या टी20 मालिकेत भारताने 2-2 अशी बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिजने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. पण त्यानंतर सलग दोन सामन्यात भारताने विजय मिळवत भारताने बरोबरी केली होती. आज दोन्ही संघामध्ये निर्णायक टी 20 सामना होणार आहे. विजेता संघ मालिका खिशात घालणार आहे. अनुभवी वेस्ट इंडिज आणि युवा भारतीय संघ जेतेपदासाठी मैदानावर उतरणार आहे. 

भारतीय संघाने लागोपाठ दोन सामने जिंकून जबरदस्त कमबॅक केले. शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल यांनी जबरदस्त सलामी दिली होती. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माही फॉर्मात आहेत. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांच्या फॉर्माची चिंता कायम आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय फलंदाज प्रभावी कामगिरी करतील. भारताची गोलंदाजीही प्रभावी आहे. चहल आणि कुलदीप यांच्या फिरकी माऱ्याला अर्शदीप आणि मुकेश कुमार यांच्या भेदक माऱ्याची जोड आहे. दुसरीकडे अनुभवी वेस्ट इंडिजही विजयासाठी उतरणार आहे. निकोलस पूरन, शाय होप, काइल मायर्स, शिमरोन हेटमायर आणि रोवमन पॉवेल भन्नाट फॉर्मात आहेत. त्याशिवाय गोलंदाजीतही विंडिजचे खेळाडू अनुभवी आहेत. तळापर्यंत दर्जेदार फलंदाज ही विंडिजची जमेची बाजू आहे. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज कोणता संघ बाजी मारणार? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघात आजच्या सामन्यात बदलाची शक्यता कमीच आहे. हार्दिक पांड्या आणि पॉवेल आपला संघ कायम ठेवण्याची शक्यता आहे. संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल. फ्लोरिडाची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. त्यामुळे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कॅरेबिअन फलंदाजांना रोखण्याचे युवा भारतीय संघापुढे आव्हान असेल. 

हेड टू हेड - 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 29 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 19 सामने जिंकलेत तर विडिंजला नऊ सामन्यात विजय मिळालाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही. 

कोण वरचढ ?

भारताच्या युवा टीमपुढे तगड्या वेस्ट इंडिजचे आव्हान आहे. कागदावर विडिंजचा संघ वरचढ दिसतोय. पहिल्या तिन्ही सामन्याची खेळपट्टी संथ होती, पण अखेरचा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होत आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, त्यामुळे आजचा सामना हायस्कोरिंग असेल. आजच्या सामन्यात विडिंजचे पारडे जड दिसतेय. पण युवा भारतीय संघ पटलावर करु शकतो. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11

यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेईंग 11

ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल (कर्णधार), शिम्रोन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, ओबेद मैककॉय

महत्त्वाच्या बातम्या

Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Embed widget