IND vs WI, 3rd T20I, Toss Update : नाणेफेक आज भारताच्या बाजूने, टीम इंडीयाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा टी20 सामना खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक झाली आहे. आज मात्र भारताने नाणफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ टीम इंडीयाने घेतला आहे.
India vs West Indies Toss Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज तिसरा टी20 सामना पार पडत आहे. पहिल्या दोन सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकली होती, पण आज मात्र भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. वेस्ट इंडीजला कमी धावांमध्ये रोखून मग लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा निर्धार भारताचा आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या सामन्यात विंडीजने हीच रणनीती अवलंबली होती, आता भारतही तसाच प्लॅन आखत आहे.
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have elected to bowl against West Indies in the third #WIvIND T20I.
— BCCI (@BCCI) August 2, 2022
Follow the match ▶️ https://t.co/RpAB697kHI pic.twitter.com/pNoojLNyqm
एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने भारताने जिंकले आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला. ज्यानंतर आता भारत टी20 मालिकाही जिंकून एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला खरा पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आता आज तिसरा सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिके आघाडी घेऊ शकतो. आजचा सामना होणाऱ्या मैदानात भारत दुसरा सामना खेळत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजने मात्र याठिकाणी 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील 7 जिंकले देखील आहेत.याशिवाय दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, हार्दीक पांड्या,दिनेश कार्तिक, आवेश खान, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह
वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.
हे देखील वाचा-