India vs West Indies Toss Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात काही मिनिटांत सुरु होणाऱ्या तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक भारताने जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर पार पडणाऱ्या या सामन्यात अखेर भारताने नाणेफेक जिंकली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत नाणेफेक भारताने गमावली होती. पण आज मात्र भारत नाणेफेक जिंकला आहे.


मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले असले तरी वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश देण्याची 39 वर्षांतील ही पहिलीच संधी भारताला चालून आली आहे. दरम्यान आजचा सामना जिंकल्यास भारत मालिका 3-0 ने जिंकून विडींजला व्हाईट वॉश देईल. दुसरीकडे वेस्ट इंडीज आजचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.






  


भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज.


वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, केसी कार्टी, अकिल होसेन, जेसन होल्डर, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, हेडन वॉल्श, किमो पॉल, जयडेन सील्स   


हे देखील वाचा-