India vs West Indies, Heah to Head Record : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West indies) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना (3rd ODI) सामना क्विन्स पार्क ओव्हल मैदानात खेळवला जाणारा आहे. विशेष म्हणजे हा सामना जिंकल्यास भारत मालिका 3-0 च्या फरकाने जिंकेल. विशेष म्हणजे वेस्ट इंडीजमध्ये 1983 पासून पहिल्यांदाच भारताचा त्यांना व्हाईट वॉश असेल. त्यामुळे 39 वर्षांपासूनचा हा रेकॉर्ड भारत आज करु शकता. दुसरीकडे वेस्ट इंडीज सामना जिंकून किमान स्पर्धेचा शेवट गोड करु शकतो. दरम्यान या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड पाहूया... 


भारत- वेस्ट इंडीज Head to Head


एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघ आतापर्यंत तब्बल 138 वेळा आमने सामने आले आहेत. यावेळी भारताचं पारडं वेस्ट इंडीजसमोर जड राहिलं असून भारताने या सामन्यांतील 69 सामने जिंकले आहेत. तर, 63 सामने वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. याशिवाय, चार सामने अनिर्णित आणि दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. अजून दोन सामने मालिकेतील शिल्लक आहेत.



संभाव्य भारतीय संघ - शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर),  युजवेंद्र चहल, आवेश खान, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.


संभाव्य वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स 



हे देखील वाचा-