IND vs WI : वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 96 धावांनी विजय
IND vs WI, 3rd ODI: अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट विंडिजचा 96 धावांनी पराभव केला आहे.
IND vs WI, Full Match Highlight: अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट विंडिजचा 96 धावांनी पराभव केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला आहे. रोहित शर्मा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच मालिका विजय आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट विडिंजला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट विंडिजचा संघ 37.1 षटकांत 169 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 265 धावा केल्या होत्या.
266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फंलदाजांना तग धरता आला नाही. मोहम्मद सिराज आणि प्रसिद कृष्णा या युवा गोलंदाजांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय दीपक चहर आणि चायनामन कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले आहे. वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. वेस्ट इंडिजकडून ओडेन स्मिथ याने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार निकोलस पूरण याने 34 धावांचे योगदान दिले. शाई होप, ब्रॅडन किंग, डॅरेन ब्राव्हो, ब्रोक्स आणि जेसन होल्डर यांना लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. ठरावीक अंताराने विकेट पडल्यामुळे वेस्ट इंडिजला सामना गमावावा लागला. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली.
3RD ODI. India Won by 96 Run(s) https://t.co/yrDtxuQxRQ #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 11, 2022
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण वेगवान गोलंदाज जोसेफ याने अचूक टप्यावर गोलंदाजी करत भारताला अडचणीत टाकले. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघ डगमगताना दिसला. पण श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं 50 षटकात 265 धावा केल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्मा (13 धावा, 15 बॉल) आणि विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्यानंतर शिखर धवनंही 10 व्या षटकात ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानात आलेले श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतनं संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये 110 धावांची भागीदारी झाली. परंतु, 29 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रिषभ पंत झेलबाद झाला. या सामन्यातही सुर्यकुमार यादवनं (7 चेंडू 6 धावा) निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला घेऊन श्रेयस अय्यरनं संघाचा डाव पुढे चालवला. पण, फॅबियन अॅलेनच्या गोलंदाजीवर श्रेयसनं त्याची विकेट्स गमावली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (33 धावा) आणि दिपक चहर 38 धावा करून बाद झाला. कुलदीप यादव 5 आणि मोहम्मद सिराजनं 4 धावा केल्या. ज्यामुळं भारतानं 50 षटकात 265 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डरनं 4 विकेट्स घेतल्या. तर, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, फॅबियन वॉल्श आणि ओडियन अॅलेन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली.
वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप -
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघामध्ये 1983 पासून द्विपक्षीय एकदिवसीय मालिका होत आहेत. आतापर्यंत दोन्ही संघामध्ये 21 एकदिवसीय मालिका झाल्या आहेत. तेव्हापासून भारतीय संघाला एकदाही वेस्ट विंडिजला क्लीन स्वीप देता आला नव्हता. या उटल वेस्ट इंडिजने मात्र तीन वेळा भारताचा क्लीन स्वीप केला होता. आता रोहित शर्मा आणि कंपनीने अखेरची लढत जिंकून इतिहास घडवला आहे. भारताने पहिल्यांदाच वेस्ट विंडिज संघाला क्लीन स्वीप दिला आहे.
हे देखील वाचा-
- ESPNcricinfo awards : ऋषभ पंतला कसोटी फलंदाजाचा पुरस्कार, तर केन विल्यमसन ठरला 'कॅप्टन ऑफ द इयर'
- IPL auction 2022 : हर्षल पटेल ते मोहम्मद शमी, 'या' वेगवान भारतीय गोलंदाजांना करारबद्ध करण्यासाठी संघ उत्सुक
- Paul Pogba On Hijab Controversy: हिजाब प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद; फ्रेंचचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाचं ट्वीट चर्चेत, म्हणाला...