Paul Pogba On Hijab Controversy: हिजाब प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद; फ्रेंचचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाचं ट्वीट चर्चेत, म्हणाला...
Hijab Controversy: कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे.
![Paul Pogba On Hijab Controversy: हिजाब प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद; फ्रेंचचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाचं ट्वीट चर्चेत, म्हणाला... Hijab Controversy: Man Utd Footballer Paul Pogba Flags Hijab Protests On Instagram Paul Pogba On Hijab Controversy: हिजाब प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद; फ्रेंचचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाचं ट्वीट चर्चेत, म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/11/7109c1c6f8355f4c69ea1c0290d8f338_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hijab Controversy: कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. कर्नाटकातील उडुपी येथील महाविद्यालयातून सुरू झालेला हिजाबचा वाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. या वादात आता मँचेस्टर युनायटेडचा फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पोग्बा (Paul Pogba) यानंही उडी घेतलीय. त्यानं ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिलीय
पॉलनं नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केलाय. पॉलनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका बाजुला हिजाब परिधान केलेल्या मुली आहेत. तर, दुसऱ्या बाजुला भगवा परिधान केलेल्या मुलांचा जमाव घोषणाबाजी करताना दिसत आहे. हिंदुत्व जमाव कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम मुलीला लक्ष्य करताना दिसत आहे, असं कॅप्शन पॉलनं या व्हिडिओला दिलं. तसेच त्यानं वर्णद्वेषावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
हिजाब परिधान केल्यामुळं त्यांना वर्गात जाऊ दिले जात नसल्याचा आरोप उडुपी येथील सरकारी गर्ल्स पीयू कॉलेजच्या काही विद्यार्थिनींनी केल्यानंतर कर्नाटकात गेल्या महिन्यात निदर्शने सुरू झाली. तेव्हापासून राज्यात अनेक ठिकाणी अशांततेच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, पुरुषांचा एका गट बुरख्यातील महिला विद्यार्थिनीकडे जात घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावर टीका देखील झाली. कमल हसन, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, हेमा मालिनी आणि जावेद अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी याबाबत मत व्यक्त केले आहे.
दरम्यान कर्नाटकातील उडुपी कॉलेजमध्ये हिजाब परिधान केल्याच्या घटनेने सुरू झालेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
हे देखील वाचा-
- Kangana Ranaut On Hijab Row: ‘हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात...’, कर्नाटक हिजाब प्रकरणावर संतापली कंगना!
- Hijab Controversy: कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद; मालेगावमध्ये साजरा होणार 'हिजाब दिवस'
- Hijab Controversy: हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद! पुण्यात राष्ट्रवादीचं भाजपविरोधात आंदोलन तर हिंदू महासभेची रॅली, गृहमंत्री म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)