IND vs WI, 1 Innings Highlight: भारताच्या अंडर 19 संघाने शनिवारी इंग्लंडला नमवत विश्वचषक जिंकला. ज्यानंतर आता सिनियर खेळाडू वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असून आजही टीम इंडिया अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन घडवत आहे. भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला अवघ्या 176 धावांमध्ये सर्वबाद केलं आहे. ज्यामुळे जिंकण्यासाठी टीम इंडियाला 177 धावांचे आव्हान आहे. यावेळी भारताचे फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. तर प्रसिध कृष्णा आणि सिराजने देखील त्यांना साथ दिली. 


सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना हात खोलण्याची संधी दिलीच नाही. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक दावा जेसन होल्डर (57) याने केल्या असून कर्णधार पोलार्डतर शून्यावर बाद झाला. ज्यामुळे संघ 43.5 ओव्हरमध्ये 176 धावांच करु शकला आहे. भारताकडून युझवेंद्र चहलने 4, सुंदरने 3, प्रसिधने 2 आणि सिराजने 1 विकेट घेतली आहे.



चहलचं अनोख शतक 


युझवेंद्र चहलने सामन्यात 9.5 ओव्हर टाकत 49 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने या 4 विकेट्सच्या मदतीने एकदिवसीय क्रिकेटमधील 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्याने एक अनोखं शतक केलं आहे. चहलच्या आजच्या गोलंदाजीमुळे संघाला मोठा फायदा झाला असून भारतीय संघात त्याचं स्थान यामुळे अधिक पक्क होण्यास मदत होणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha