Hardik Pandya Ranji Trophy 2022 Baroda: काय चर्चेत असणारा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भारतीय संघात पुनरागमनाच्या तयारीकरता 10 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत भाग घेणार नाही. केदार देवधर बडोदा संघाचा कर्णधार असणार आहे. तर विष्णू सोलंकी उपकर्णधार असणार आहे. बडोदा क्रिकेट संघाने टूर्नामेंटसाठी 20 सदस्यीय टीमची नुकतीच घोषणा केली आहे. ज्यामध्ये हार्दीकचं नाव नाहीये.


हार्दिक दुखापतीमुळे आणि मागील काही काळापासून मैदानापासून दूर आहे. टी20 विश्वचषकानंतर तो भारतीय संघात नसल्याचं दिसून येत आहे. तो खेळताना गोलंदाजी करत नसल्याने त्याच्यावर अनेक टीका देखील होत होत्या. तर दुसरीकडे डिसेंबर, 2018 पासून तो लाल चेंडूने क्रिकेट खेळलेला नाही. आता नुकतंच नवा आयपीएल संघ अहमदाबादचं कर्णधारपद त्याला देण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्याकडून अनेकांना अपेक्षा आहेत. 


बडोदा टीम : केदार देवधर, विष्णु सोलंकी, प्रत्युष कुमार, शिवालिक शर्मा, कृणाल पांड्या, अभिमन्यु सिंह राजपूत, ध्रुव पटेल, मितेश पटेल, लुकमान मेरीवाला, बाबा सफीखान पठान, अतीत शेठ, भार्गव भट, पार्थ कोहली, शाश्वत रावत, सोयेब सोपारिया, कार्तिक काकाडे, गुरजिंदर सिंह मान, ज्योत्सनिल सिंह, निनाद राठवा, अक्षय मोरे.


हार्दिकसह राशिद आणि शुभमनही अहमदाबादमध्ये


आयपीएलमधील 8 संघानी त्यांचे खेळाडू रिटेन केल्यानंतर लिलावापूर्वी लखनौ आणि अहमदाबाद या दोन आयपीएलमधील नव्या संघानाही तीन-तीन खेळाडू घेण्याची मुभा देण्यात आली. ज्यानंतर लखनौ संघाने केएल राहुल, स्टॉयनिस आणि बिश्नोई यांना करारबद्ध केलं आहे. तर अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पंड्या, फिरकीपटू राशिद खान आणि शुभमन गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. हार्दिककडे अहमदाबाद संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. हार्दिक आणि राशिद खान यांना अहमदाबाद संघाने प्रत्येकी 15-15  कोटी रुपये दिले आहेत. तर शुभमन गिल याला आठ कोटी रुपयांत करारबद्ध केलं आहे. तीन खेळाडूंसाठी अहमदाबाद संघाने 38 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे या संघाकडे आता 52 कोटी रुपये शिल्लक आहेत.    


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha