PKL 2021 Bengal Warriors vs Gujarat Giants Live Streaming: प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामातील 86 व्या सामन्यात बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) आणि गुजरात जायंट्स  (Gujarat Giants) आज (1 फेब्रुवारी) आमनेसामने येणार आहेत. बंगाल वॉरियर्सनं या हंगामात14 सामन्यांपैकी 7 विजय आणि 6 पराभव पत्करले आहेत. तर, एक सामना बरोबरीत सुटला आहे. बंगालचा संघ 41 गुणांसह लीग टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे या हंगामात गुजरातचं अतिशय निराशाजनक कामगिरी केलीय. गुजरात जायंट्सने 13 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. संघाचे 3 सामनेही बरोबरीत सुटले आहेत. हा संघ 33 गुणांसह लीग टेबलमध्ये 11व्या क्रमांकावर आहे.


बंगाल वॉरिअर्स आणि गुजरात जॉयंट्स यांच्यातील सामन्याला आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.  बंगाल वॉरिअर्स आणि गुजरात जॉयंट्स यांच्यातील सामना शेरेटन ग्रँड बेंगळुरू व्हाईटफील्ड हॉटेल आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे खेळला जाणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जात आहेत. यामध्ये स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स कन्नड वाहिन्यांचा समावेश आहे.तसेच डिस्ने+हॉटस्टार अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. सामना पाहण्यासाठी तुम्हाला अॅपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.


संघ-


गुजरात जॉयंट्स 


रेडर्स: रमनजीत सिंग, सोनू, रतन के, मनिंदर सिंग, हर्षित यादव, प्रदीप कुमार, अजय कुमार


ऑलराऊंडर: हादी ओश्तोराक, गिरीश मारुती एर्नाक


डिफेंडर्स: परवेश भैंसवाल, सुमित कुमार, सुमित, अंकित, सोलेमान पहेलवानी


बंगाल वॉरियर्स


रेडर्स: मनिंदर सिंह, रवींद्र रमेश कुमावत, सुकेश हेगडे, सुमित सिंह, रिशांक देवाडिगा, आकाश पिकलमुंडे, सचिन विट्टल


ऑलराऊंडर: मोहम्मद इस्माईल, मनोज गौडा, रोहित


डिफेंडर्स: रिंकू नरवाल, अबोझर मोहजर मिघानी, परवीन, विजिन थंगादुराई, रोहित बन्ने, दर्शन


हे देखील वाचा-