IND vs WI, 1st ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला सहा विकेट्सनी मात देत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आधी भारताने  वेस्ट इंडिजला अवघ्या 176 धावांमध्ये सर्वबाद केलं आहे. ज्यामुळे जिंकण्यासाठी टीम इंडियाला 177 धावांचे आव्हान होते. यावेळी रोहितने अप्रतिम सुरुवात करत अर्धशतक झळकावलं, ज्यानंतर सूर्यकुमार आणि दीपक हुडा यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत 28 षटकात विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे ही भारताची एक हजारावी वन डे होती, जी जिंकत भारताने हजारावी वन-डे अविस्मरणीय केली आहे. सामन्यात भारताचे फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. तर प्रसिध कृष्णा आणि सिराजने देखील त्यांना साथ दिली. 



असा पार पडला सामना


सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना हात खोलण्याची संधी दिलीच नाही. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा जेसन होल्डर (57) याने केल्या असून कर्णधार पोलार्डतर शून्यावर बाद झाला. ज्यामुळे संघ 43.5 ओव्हरमध्ये 176 धावांच करु शकला आहे. भारताकडून युझवेंद्र चहलने 4, सुंदरने 3, प्रसिधने 2 आणि सिराजने 1 विकेट घेतली. ज्यानंतर 177 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून रोहित आणि इशान यांनी उत्तम सुरुवात केली. पण अर्धशतक होताच 60 धावांवर रोहित बाद झाला. त्यानंतर इशान (28), कोहली (8), पंत (11) हे पटापट तंबूत परतले. पण नंतर सूर्यकुमार यादव (नाबाद 34) आणि दीपक हुडा (नाबाद 26) यांनी अखेरपर्यंत क्रिजवर टीकत राहून भारताचा विजय पक्का केला. सामन्यानंतर माजी कर्णधार विराटने एक जिंकला दोन बाकी असं सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचा उत्साह दर्शवला आहे.


 







चहलचं अनोख शतक 


युझवेंद्र चहलने सामन्यात 9.5 ओव्हर टाकत 49 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने या 4 विकेट्सच्या मदतीने एकदिवसीय क्रिकेटमधील 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्याने एक अनोखं शतक केलं आहे. चहलच्या आजच्या गोलंदाजीमुळे संघाला मोठा फायदा झाला असून भारतीय संघात त्याचं स्थान यामुळे अधिक पक्क होण्यास मदत होणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha