IND vs WI, 1st T20 Live Blog: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पहिल्या टी20 सामन्यात भारताचा विजय, 6 विकेट्सनी जिंकला सामना

IND vs WI, 1st T20, Eden Garden Stadium: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे

abp majha web team Last Updated: 16 Feb 2022 06:16 PM
भारत 6 विकेट्सनी विजयी

भारताने 18.5 षटकात निर्धारीत टार्गेट पूर्ण करत 6 विकेट्सनी विजय मिळवला आहे.

भारत विजयाच्या जवळ

भारताचे चार गडी बाद झाले असले तरी भारताची फलंदाजी तगडी असल्याने भारताचा विजय जवळपास निश्चित आहे. भारताला 26 चेंडूत 35 धावांची गरज आहे.

भारताला पहिला झटका

भारताचा कर्णधार रोहित शर्मा 40 धावा करुन तंबूत परतला आहे. तुफान फटकेबाजी केल्यानंतर  अखेर तो चेसच्या चेंडूवर स्मिथच्या हाती झेलबाद झाला आहे.

ईशान-रोहित जोडीची धमाल

ईशान किशन आणि रोहित शर्मा जोडीने धमाकेदार फलंदाजी सुरु केली असून 4 षटकात भारताने 44 धावा केल्या आहेत.

रोहित-ईशान क्रिजवर

भारताने फलंदाजीला सुरुवात केली असून भारताकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन क्रिजवर आले आहेत.

वेस्ट इंडीजचं भारतासमोर 158 धावाचं लक्ष

भारतानं वेस्ट इंडीजसमोर 158 धावाचं लक्ष ठेवलं आहे. पूरनच्या अर्धशतकाच्या जोरावर ही धावसंख्या उभारली आहे.

पूरन 61 धावा करुन बाद

निकोलस पूरनची विकेट हर्षल पटेलने घेतली आहे.

पूरनचं संयमी अर्धशतक

यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने एकहाती संघाचा भार सांभाळत धावसंख्या 100 च्या पुढे नेत अर्धशतकही पूर्ण केलं आहे.

100 धावांच्या आत विंडिजता निम्मा संघ तंबूत

बिश्नोईने दोन तर दीपक चहरने एक विकेट घेतल्याने 96 धावांवर वेस्ट इंडीजचे 5 गडी बाद झाले आहेत.

चहलने मिळवून दिलं भारताला दुसरं यश

तुफान फटकेबाजी करणाऱ्या मेयर्सला चहलने पायचीत केलं आहे.

वेस्ट इंडीजची तुफान फटकेबाजी

पहिल्या षटकात विकेट गमावल्यानंतर मात्र विंडीजने धमाकेदार फलंदाजी करत 6.1 ओव्हरमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आहेत.

भारताला पहिलं यश

सामना सुरु होताच पहिल्या ओव्हरमध्येच भारताच्या भुवनेश्वर कुमारने वेस्ट इंडीजचा सलामीवीर ब्रँडनला तंबूत धाडलं आहे.

पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल

रवी बिश्नोईची टीम इंडियात एन्ट्री

फिरकीपटू रवी बिश्नोईला नुकतीच इंडियन कॅप मिळाली असून तो भारतीय संघात आज आगमन करत आहे.


भारतीय संघ सज्ज

पहिल्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ मैदानावर पोहोचला असून सराव पूर्ण करुन थोड्याच वेळात कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात येतील.


तीन सामन्यांची टी20 मालिका

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या तीन सामन्यांची टी20 मालिकाल खेळवली जाणार असून आज पहिला सामना खेळवला जात आहे. उर्वरीत सामने 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी पार पडतील.

पार्श्वभूमी

IND vs WI, 1st T20 Live: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला टी20 सामना (1st T20match) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Garden Stadium) या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना चुरशीचा होणार कारण दोन्ही संघ टी20 फॉर्मेटमध्ये उत्तम आहेत. दोन्ही संघामध्ये स्पेशलिस्ट टी20 खेळाडू असल्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे असणार आहे.


या मालिकेपूर्व, केएल राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिग्टंन सुंदर दुखापतग्रस्त झाले. ज्यांच्या जागी, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळालं आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारत हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यात आता टी20 स्पेशलिस्ट संघासोबत भारताची गाठ आहे. त्यामुळे सावध पण आक्रमक खेळ करु भारताला विजय मिळवावा लागणार हे नक्की.  


पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (India’s T20I squad) 


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल


पहिल्या टी-20 सामन्यासाठी वेस्ट इंडीज संघ (WI T20I squad) 


ब्रँडन किंग, काईल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोवमॅन पोवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडेन स्मिथ, फॅबियन अॅलन, शेल्डॉन कॉट्रेल


उर्वरीत टी-20 सामन्यांचं वेळापत्रक 


दुसरा टी-20 सामना- 18 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
तिसरा टी-20 सामना- 20 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)


सामना प्रेक्षकांविना -


"बीसीसीआयने पहिल्या सामन्यासाठी प्रायोजक आणि प्रतिनिधींसाठी फक्त हॉस्पिटॅलिटी बॉक्सेसना परवानगी दिली आहे. याचदरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयला यावर पुनर्विचार करण्याची आणि अखेरच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याची विनंती केलीय. तसेच बोर्डाकडून परवानगी मिळताच प्रेक्षकांना कळवण्यात येईल, असंही बंगाल क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या निवेदनात म्हटलंय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.