IND vs WI, 1st T20 : पुन्हा दिनेश कार्तिक बनला संकटमोचक, अखेरच्या ओव्हर्समध्ये तुफान फटकेबाजी, वेस्ट इंडीजसमोर 191 धावांचं लक्ष्य
India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी20 मलिकेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने उत्तम गोलंदाजी केली पण कर्णधार रोहितचं अर्धशतक आणि कार्तिकच्या फटकेबाजीने भारताची नौका सावरली आहे.
IND vs WI T20 1st Innings Highlights : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी अगदी भेदक अशी गोलंदाजी देखील केली, पण कर्णधार रोहितचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीने भारताचा डाव सावरला. ज्यामुळे आता वेस्ट इंडीजला विजयासाठी 191 धावा करायच्या आहेत.
Dinesh Karthik's sizzling knock helps India post a big total 💪
— ICC (@ICC) July 29, 2022
Watch #WIvIND for FREE on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions) 📺 | 📝 Scorecard: https://t.co/2MDSoy7tTt pic.twitter.com/YE5xg98NtA
सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाला कमी धावांमध्ये रोखून नंतर निर्धारीत धावसंख्या पूर्ण करण्याची त्यांची रणनीती होती. त्यानुसार त्यांनी दमदार गोलंदाजीही केली. पण भारताचा कर्णधार रोहित शर्मा आज चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यामुळे एका बाजूने विकेट्स पडत असतानाही त्याने आपला खेळ कायम ठेवत दमदार असं अर्धशतक ठोकलं. त्याने 44 चेंडूत 64 धावा करत भारताचा डाव सावरला. पण तो बाद झाल्यावर भारताची धावसंख्या कमी होईल असं वाटत होतं. तेव्हाच अनुभवी दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजी करत 19 चेंडूत नाबाद 41 धावा कुटल्या आणि भारताची धावसंख्या 190 पर्यंत नेली. ज्यामुळे आता वेस्ट इंडीजला विजयासाठी 20 षटकात 191 धावा करायच्या आहेत. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफने दोन तर ओबेद मकॉय, जेसन होल्डर, अकेल हुसेन आणि किमो पॉल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने भारताने जिंकले आणि वेस्ट इंडीजला 39 वर्षांत प्रथमच त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला. ज्यानंतर आता भारत टी20 मालिकाही जिंकून एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली आहे.
हे देखील वाचा-